'खेलो इंडिया'वर महाराष्ट्राची छाप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कौतुकाची थाप!

Khelo India Youth Games 2022 Maharashtra Won 45 Gold Medals CM uddhav thackeray Congratulate Players
Khelo India Youth Games 2022 Maharashtra Won 45 Gold Medals CM uddhav thackeray Congratulate Playersesakal

पंचकुला : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी उपक्रम खेलो इंडिया 2022 हरियाणाच्या पंचकुला येथे पार पडला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी चांगली छाप पाडली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी तब्बल 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 40 कांस्य पदकांची कमाई केली. महाराष्ट्रातील काही खेळाडूंनी तर राष्ट्रीय विक्रम देखील प्रस्थापित केले. या सर्व खेळाडूंच्या पाठीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. (Khelo India Youth Games 2022 Maharashtra Won 45 Gold Medals CM uddhav thackeray Congratulate Players)

Khelo India Youth Games 2022 Maharashtra Won 45 Gold Medals CM uddhav thackeray Congratulate Players
ICC Men's ODI Team Rankings : पाकिस्तानने भारताला केले 'ओव्हरटेक'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यशस्वी खेळाडूंचे कौतुक करताना म्हणाले, 'महाराष्ट्राची क्रीडा परंपरा उज्वल आहे. आपल्या जिगबाज खेळाडूंनी या क्रीडा परंपरेला आणि महाराष्ट्राच्या नावाला सुवर्ण झळाली देण्यारी कामगिरी करून दाखवली आहे.' खेळाडूंबरोबरच उद्धव ठाकरे यांनी खेळाडूंचे कुटुंबीय, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांचेही अभिनंदन केले.

Khelo India Youth Games 2022 Maharashtra Won 45 Gold Medals CM uddhav thackeray Congratulate Players
कार्तिकला वगळून पटेलला बढती.. स्मिथ, गावसकरांनी पंतचे पिळले कान!

खेलो इंडियाच्या शेवटच्या दिवशी खो - खो स्पर्धेत मुलांच्या संघाबरोबरच मुलींनी देखील सुवर्णपदक पटकावून स्पर्धेचा शेवट गोड केला. मुलांच्या आणि मुलींच्या खो - खो संघाने अंतिम सामन्यात ओडिसाचा पराभव केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयाला गवसणी घातल्यानंतर जय भवानी - जय शिवाजीच्या जयघोषात आसमंत दणाणून सोडला. याचबरोबर ठोल ताशाच्या तालावर ठेकाही धरला. या जल्लोषी वातावरणात महाराष्ट्रापाठोपाठ ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या आनंदात सहभाग नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com