Maharashtra Kho Kho teams in Semi final of Kho Kho National championship : पुरी (ओडिशा) : महाराष्ट्राच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांनी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. रेल्वे आणि कोल्हापूरच्या पुरुष संघांनीही प्रभावी कामगिरी करत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने पश्चिम बंगालचा ३१-२४ असा पराभव केला.