Kho-Kho Championship Trails: पुरुष विभागात धाराशिव, सोलापूर, सांगली अव्वल

State Kho-Kho Championship Trails: अहिल्यानगर येथे पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
kho-kho Championship trails
kho-kho Championship trailsesakal
Updated on

पुरुष विभागात धाराशिव, सोलापूर, सांगली या संघांनी, तर महिला विभागात धाराशिव, मुंबई उपनगर व रत्नागिरी या संघांनी गटात अव्वल स्थान मिळवले. अहिल्यानगर येथे हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला विभागातील लढतीत धाराशिव संघाने सकाळच्या सत्रात झालेल्या छत्रपती संभाजीनगरचा एक डाव १७ गुणांनी (२२-५) पराभव केला. विजयी संघातर्फे मिताली पवार (३.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (तीन मिनिटे संरक्षण व चार गुण) यांनी चांगला खेळ केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com