आऊट होताच पोलार्डने ब्राव्होच्या पोटावर मारली बॅट (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

जगभरातील दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. यापूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ब्राव्हो विनिपेग हॉक्स संघाकडून खेळत आहे.

ओटावा : कॅनडात सुरु असलेल्या टी-20 लीगमध्ये वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडूंमधील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. किरॉन पोलार्ड ड्वेन ब्राव्होचा पोटात बॅटने मारतानाचा हा व्हिडिओ आहे.

जगभरातील दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. यापूर्वी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ब्राव्हो विनिपेग हॉक्स संघाकडून खेळत आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात त्यानं वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज पोलार्डची विकेट घेतली. ब्राव्होच्या गोलंदाजीवर पोलार्ड झेलबाद झाला. तेव्हा ब्राव्हो आनंद साजरा करत होता. त्यावेळी पोलार्डने ब्राव्होला बॅटने डिवचले. याचा व्हिडिओ आता सोशल मडियावर व्हायरल होत आहे. ब्राव्हो विकेट घेतल्यावर नेहमीच त्याच्या स्टाइलने सेलिब्रेशन करतो. आयपीएलमध्येही डान्सची भूरळ अनेकांना पडली होती.

विनिपेग हॉक्स आणि टोरांटो नॅशनल्स यांच्यात झालेल्या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. हॉक्सने हा सामना जिंकला. त्यांच्याकडून ख्रिस लिनने 48 चेंडूत 89 धावांची केळी केली. तर भारतीय वंशाच्या सनी सोहेलने 27 चेंडूत 58 धावांची खेळी केली. टोरांटो नॅशनल्सने 20 षटकांत 216 धावा केल्या होत्या. टोरांटो नॅशनल्सकडून युवराज सिंगने 46 तर पोलार्डने 51 धावांची खेळी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kireon Pollard hit bat to bravo after take his wicket in global T20 Canada