शाहरुखच्या संघातून चमकलेल्या हिरोला टीम इंडियात 'मौका'

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनं टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला लागेल.
Venkatesh Iyer
Venkatesh Iyer Sakal

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर रोहित कर्णधार होणार हे पक्के होते. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. त्याच्यासोबतच उप कर्णधार पदाची जबाबदारी ही लोकेश राहुलवर सोपवण्यात आलीये. न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यातील काही जणांना टीम इंडियात पदार्पणाची सुवर्ण संधी मिळू शकते.

आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक धावा करुन चेन्नई सुपर किंग्जला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या ऋतूराज गायकवाडला टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे. त्याच्यासोबत कोलकाता नाईट रायडर्सकडून लक्षवेधी खेळी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरला संघात स्थान मिळाले आहे. व्यंकटेश अय्यरने कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाला सुरुवात करताना दमदार कामगिरी करुन दाखवली होती. तो गोलंदाजीही करण्यात सक्षम आहे. अष्टपैलू म्हणून त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Venkatesh Iyer
रोहित कॅप्टन झाला रे! न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची घोषणा

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले गेल. मात्र टीम इंडियाने सर्वांनाच निराश केले. साखळी फेरीतील पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील सलग दोन पराभव टीम इंडियाला चांगलेच महागात पडले. पुढील तीन सामने मोठ्या फरकाने जिंकूनही त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. यंदाच्या वर्ल्ड कप गमावल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनं टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला लागेल.

Venkatesh Iyer
T 20 WC : फायनलसाठी UAE सरकारनं राखली BCCI ची मर्जी

व्यंकटेश अय्यरने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले आहेत. यात त्याने 4 अर्धशतकाच्या मदतीने 370 धावा केल्या असून 67 ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. चार डावात त्याने गोलंदाजीही टाकली. 51 चेंडूत 69 धावा करुन त्याने 3 विकेट्सही घेतल्या होत्या. मोक्याच्या क्षणी तो काही ओव्हर टाकू शकतो.

भारत न्यूझीलंड टी-20 सामन्याचे शेड्युल

बुधवारी 17 नोव्हेंबर पहिला टी-20 सामना जयपूर

शुक्रवार 19 नोव्हेंबर दुसरा टी-20 सामना रांची

रविवार 21 नोव्हेंबर तिसरा टी 20 सामना कोलकाता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com