KL Rahul-Athiya: झालं एकदाचं लग्न! राहुल-अथिया हनीमूनला कधी अन् कोठे जाणार...? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul Athiya Honeymoon

KL Rahul-Athiya: झालं एकदाचं लग्न! राहुल-अथिया हनीमूनला कधी अन् कोठे जाणार...?

KL Rahul Athiya Honeymoon : भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी 23 जानेवारीला लग्नाच्या बंधनात अडकले. अथियाचे वडील आणि अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये जवळपास 100 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नानंतर रिसेप्शनच नाही तर हनीमूनही पुढे ढकलण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल आणि अथियाने त्यांच्या कमिटमेंट्स आणि बिझी शेड्युलमुळे त्यांची हनिमून ट्रिप रद्द केली आहे. हा हनिमून प्लान मे महिन्यात करण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे केएल राहुलचे शेड्यूल खूपच पॅक आहे.

हेही वाचा: IND vs NZ : रोहितचे कर्णधारपद जाणार? कोच द्रविडचे धक्कादायक विधान!

केएल राहुलला फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरची कसोटी मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली असून त्यात राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात खेळल्या जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर केएल राहुलला आयपीएल मध्येही खेळायचे आहे. राहुल हा आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. हे आयपीएल मार्चच्या अखेरीपासून ते मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालू शकते. त्यामुळेच पुढील तीन महिने राहुल खूप व्यस्त असणार आहेत.

हेही वाचा: Pakistan Chief Selector: कोण आहे हारून राशिद ज्याने बूम बूम आफ्रिदीला खुर्चीवरून खाली खेचले?

दुसरीकडे, अथिया शेट्टीने नुकतेच तिचे यूट्यूब चॅनल लॉन्च केले आहे. अशा परिस्थितीत ती या कामात व्यस्त आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर राहुल आणि अथिया हनीमूनसाठी युरोपला जाणार आहेत. त्याचवेळी अथियाचे वडील आणि बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी यांनी लग्नानंतर एक मोठा रिसेप्शनही आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पण हे रिसेप्शन आयपीएलनंतर होणार आहे.