KL Rahul-Athiya Shetty Marriage : अथिया शेट्टी अन् केएलचं 'शुभमंगल डेस्टिनेशन' ठरलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kl rahul athiya shetty marriage date

KL Rahul-Athiya Shetty Marriage : अथिया शेट्टी अन् केएलचं 'शुभमंगल डेस्टिनेशन' ठरलं

KL Rahul-Athiya Shetty Marriage : बऱ्याच दिवसांपासून अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आता अंतिम तयारी सुरू झाली आहे कारण काही महिन्यांत हे जोडपे लग्नाचे सात फेरे घेणार आहे. एवढेच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार, सुनील शेट्टी आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करणार आहे. बॉलीवूडच्या बड्या स्टार्सना बोलावण्याची योजना केली आहे. लग्नासंदर्भातील सर्वात मोठी अपडेट म्हणजे लग्नाचे ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. अथिया आणि राहुल एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही तर शेट्टीच्या खंडाळा बंगल्यात लग्न करणार आहेत.

दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून हा निर्णय घेतला असून राहुल लग्नाची तारीख निश्चित करेल, जी त्याच्या कामाच्या वेळापत्रकावर अवलंबून असेल. पिंकविलाच्या हवाल्याने अथिया आणि राहुलच्या लग्नाचे ठिकाण फायनल झाल्याची बातमी समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या तयारीसाठी एक सुप्रसिद्ध वेडिंग आयोजक आपल्या टीमसह खंडाळ्यात आले आहेत.

सुनील शेट्टीचा खंडाळ्यात बंगला आहे, ज्याचे नाव 'जहाँ' आहे. हा खूप मोठ्या परिसरात बांधला गेला आहे आणि तो अतिशय विलासी आहे. बंगल्याच्या आजूबाजूला भरपूर हिरवळ आहे आणि आतून तो अनेक वनस्पतींनी सजलेला आहे. लग्नाला येणार्‍या पाहुण्यांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोकळा वेळ द्यावा, असे लवकरच सांगण्यात येणार आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनंतर अथिया शेट्टी आणि राहुल यांचे बॉलिवूड-क्रिकेट जगतातील दुसरे मोठे लग्न होणार आहे.