Virat Kohli : विराटच्या वक्तव्याने खळबळ; 'कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा फक्त धोनीने...'

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक 2022 च्या हंगामात आपली जुनी लय पुन्हा दिसला
MS Dhoni And Virat Kohli
MS Dhoni And Virat Kohli sakal

Virat Kohli India vs Pakistan : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक 2022 च्या हंगामात आपली जुनी लय पुन्हा दिसला. कोहलीने स्पर्धेतील तिसरा सामना खेळला आणि सलग दुसरे अर्धशतक झळकावले. भारतीय संघ जिंकू शकला नसला तरी कोहली मात्र आपल्या जुन्या रंगात दिसला आहे. सामना संपल्यानंतर कोहलीने आपली व्यथा मांडली. जेव्हा तो वाईट टप्प्यातून जात होता आणि जेव्हा त्याने टी-20 किंवा कसोटीचे कर्णधारपद सोडले तेव्हाची परिस्थिती त्याने सांगितली.

MS Dhoni And Virat Kohli
IND vs PAK : अर्शदीपचा ड्रॉप कॅच, हिरो ते झिरो भुवी.. भारताच्या पराभवाची 5 कारणे

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर कोहली म्हणाला, जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले, तेव्हा फक्त महेंद्रसिंग धोनीने मैसेज केला होता. अनेकांकडे माझा नंबर आहे पण फक्त त्यांनीच मला कॉल केला. टीव्हीवर बरेच लोक सल्ले देत होते. लोकांना टीव्हीवर खूप काही बोलायचं असतं. माझा पर्सनल नंबर अनेकांकडे आहे पण कोणाचा मेसेज आला नाही.

कोहलीनेही उघडपणे टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत तो म्हणाले, मला कोणाला काही सांगायचे असेल तर मी वैयक्तिकरित्या सांगेन. जगाला सल्ले दिले तर माझा काय उपयोग? तुम्हाला माझ्या कामाबद्दल काही सांगायचे असेल किंवा सुचवायचे असेल तर तुम्ही मला वैयक्तिकरित्या देऊ शकता.

MS Dhoni And Virat Kohli
Video : चांगली बॉलिंग करणाऱ्या अर्शदीपवर एका कॅचमुळे भडकला रोहित

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 विकेटवर 181 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 44 चेंडूत 60 धावा केल्या. कोहलीचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. त्याने आपल्या खेळीत एक षटकार आणि 4 चौकार मारले. 182 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तान संघाने 5 गडी गमावून 182 धावा करत सामना जिंकला. सामन्याचा हिरो ठरलेल्या रिझवानने 51 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com