
KL Rahul : टीम इंडियाला मोठा धक्का; रोहित पाठोपाठ कर्णधार राहुल देखील बाहेर?
IND vs BAN 2nd Test KL Rahul Injury: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या कसोटी संघाचा सध्याचा कर्णधार केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी त्याच्याबाबत एक अपडेट दिले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यासाठी राहुलला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र आता तो जखमी झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे.
हेही वाचा: KL Rahul : कर्णधारांचा हातच दुखावतोय; केएल राहुल देखील दुसऱ्या कसोटीला मुकणार?
भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारपासून कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी राहुलला दुखापत झाली. क्रिकइन्फोवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सरावादरम्यान राहुलच्या हाताला दुखापत झाली. मात्र राहुलची दुखापत फारशी गंभीर नसण्याची आशा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ही फारशी गंभीर बाब वाटत नाही. ते छान वाटतात. आशा आहे की ते ठीक आहेत. डॉक्टर या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण आशा आहे की सर्व काही ठीक होईल.
हेही वाचा: Ramiz Raja: वाचाळवीर रमीझ राजाची हकालपट्टी! कोणाला मिळाली PCB चेअरमनपदाची खुर्ची ?
नेटसेशनच्या शेवटी राहुलच्या हाताला फटका बसला आणि तो जखमी झाला. त्यानंतर राहुल दुखापतीच्या ठिकाणी हात चोळताना दिसला. दरम्यान डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. रोहितच्या अनुपस्थितीत राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित दुखापतीमुळे बाहेर पडत आहे. आता रोहित दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर असल्याने राहुलच्या खेळण्यावर साशंकता आहे.
भारत आणि बांगलादेश 14 डिसेंबरपासून यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 188 धावांनी विजय मिळवला. आता या मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून ढाका येथे होणार आहे.