गत मोसमातील कर्णधार रविचंद्रन अश्विन दिल्ली कॅपिटल्समध्ये गेल्याने पंजाबने पुढील मोसमासाठी लोकेश राहुलला कर्णधार म्हणून जबाबदारी दिली आहे. अश्विननंतर राहुलकडे कर्णधारपद जाणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नवी दिल्ली : आयपीएलच्या पुढील मोसमासाठी एकीकडे खेळाडूंचा लिलाव सुरु असताना सकाळी किंग्ज इलेव्हन पंजाबने आपला फलंदाजीच्या प्रशिक्षकाची घोषणा केली. आता त्यांनी नव्या कर्णधाराचीही घोषणा केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गत मोसमातील कर्णधार रविचंद्रन अश्विन दिल्ली कॅपिटल्समध्ये गेल्याने पंजाबने पुढील मोसमासाठी लोकेश राहुलला कर्णधार म्हणून जबाबदारी दिली आहे. अश्विननंतर राहुलकडे कर्णधारपद जाणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
IPL 2020 : मानसिक स्वास्थ गमावले अन् मॅक्सवेलने तब्बल कमावले...
गतवर्षात पंजाबने चांगली सुरवात केली होती मात्र, त्यानंतर त्यांचा खेळ खालावत गेला होता. यावर्षी नवे खेळाडू, वसिम जाफरच्या रुपात मिळालेला नवा बॅटींग कोच आणि नवा कर्णधार यांमुळे संघाची कामगिरी सुधारते का पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.