कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ अ, पोलिस संघ विजयी 

Kolhapur Football Competition PTM Kolhapur Police Wins
Kolhapur Football Competition PTM Kolhapur Police Wins

कोल्हापूर - के. एस. ए.वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ अ आणि कोल्हापूर पोलिस संघाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत हंगामाची सुरवात केली, तर खंडोबा तालीम मंडळाच्या अ आणि ब संघाना हार पत्करावी लागली. दोन्ही सामने 3-1 गोल फरकाने राहिले. 

राजर्षी छत्रपती शाहू स्टेडियम येथे पाटाकडील "अ' व कोल्हापूर पोलिस संघानी विजयी सलामी दिली. तत्पूर्वी सामन्याचे उद्‌घाटन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी किक ऑफ करून केली. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, के.एस. ए. अध्यक्ष मालोजीराजे, एआयएफएफच्या सदस्या मधुरिमाराजे, खासदार संजय मंडलिक, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह के. एस. ए पदाधिकारी उपस्थित होते. 

असा रंगला पहिला सामना

स्पर्धेतील सुपर 8 मधील पहिला सामना कोल्हापूर पोलिसविरुद्ध खंडोबा ब यांच्यात झाला. सामन्याच्या सुरूवातीस काही मिनिटे खंडोबा ब संघाने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या 11 व्या मिनिटाला खंडोबा "ब'कडून रुद्रेश मांद्रेकर याने गोलची नोंद करत संघास 1-0 ने आघाडी मिळवून दिली. पोलिस संघाने यानंतर आक्रमण करत14 व्या मिनिटास सागर भोसले याने गोल नोंदवत सामना 1-1 बरोबरीत आणला. पाठोपाठ32 व्या मिनिटाला पोलिस संघाकडून सचिन गायकवाड याने गोल नोंदवत गोल संख्या 2-1 असा केला. सामन्याच्या उत्तरार्धात 65 व्या मिनिटाला पोलिस संघाच्या तोहिद मलादी याने गोल करीत 3-1 अशी भक्कम आघाडी घेत विजय मिळवला. 

असा रंगला दुसरा सामना

दुसरा सामना पाटाकडील "अ' विरुद्ध खंडोबा "अ' या दोन संघात झाला. सामन्याच्या सुरावातीपासूनच खंडोबा संघाने आक्रमक खेळ केला. मात्र, सूत्रबद्धतेच्या कमतरतेमुळे गोलजाळीपर्यंत जाणे शक्‍य ज़ले नाही. यानंतर पाटाकडीलच्या ऋषिकेशमेथे-पाटील, ओंकार पाटील, ओंकार जाधव, वृषभ ढेरे यांनी आक्रमक व वेगवान खेळ केला. सामन्याच्या 23 व्या मिनिटाला पाटाकडीलकडून सैफ हकीमने दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटील याने पहिल्या गोलाची नोंद करत संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 29 व्या मिनिटाला पाटाकडीलकडून रियान यादगिरीने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागून मागे आला. ही संधी साधत ऋषिकेश मेथे-पाटीलने हेडद्वारे दुसऱ्या गोलची नोंद करीत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 32 व्या मिनिटाला ऋषिकेष याने मैदानी गोल करीत संघाला पूर्वार्धातच 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. याच बरोबर हंगामाची पहिली हॅट्रिक देखील ऋषिकेष मेथे-पाटील याने साधली. उत्तरार्धात खंडोबा अ संघाने वेगवान चाली रचत शॉर्टपासच्या जोरावर चांगला खेळ केला. खंडोबा "अ'कडून प्रथमेश पाटील, प्रभु पोवार, अल्विन जे यांनी प्रयत्नात सातत्य ठेवले. यात अल्विन जे ने 55 व्या मिनिटाला गोल करीत संघाची आघाडी 3-1 ने कमी केली. यानंतरही खंडोबा "अ'कडून अल्वीन जेला गोल करण्याची नामी संधी आली होती. मात्र, त्याचा फटका गोलपोस्ट जवळून गेला. अखेरपर्यंत 3-1 अशी आघाडी कायम राहील्याने सामना पाटाकडील अ संघाने जिंकत तीन गुणांची कमाई केली. 

सोमवारचे सामने 

  • *पाटाकडील तालीम मंडळ "ब'विरुद्ध बी. जी. एम.स्पोर्टस : दुपारी 2 वाजता 
  • प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लब "अ'विरुद्ध संयुक्त बुधवार पेठ दुपारी 4 वाजता 

फुटबॉलचा किकऑफ अन्‌ संयमी प्रेक्षक... 

कोल्हापूरच्या बहुचर्चित फुटबॉल हंगामाला आज (ता. 15) सुरवात झाली. तब्बल 8 महिने आणि 21 दिवसांनी सुरू झालेल्या या हंगामासाठी प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनीही जोश दाखवला. मात्र, स्वतःचा होश सांभाळूनच. यामुळे हा हंगाम पूर्ण सुरळीत होईल अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली. 

दहा हजाराहून अधिक प्रेक्षक

कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम आज 10 हजाराहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षिने सुरू झाला. कोल्हापूरच्या या फुटबॉल मैदानाने प्रचंड गोंधळ अनुभवाला असल्याचा इतिहास आज फुटबॉलच्या खऱ्या चाहत्यांनी बदलला. खेळाचा आस्वाद घेत जल्लोष केला. मात्र त्यातही स्वतःच्या मर्यादा राखल्या. आज रविवार आणि त्यात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना मैदानावर भिडताना पाहण्याची नामी संधी फुटबॉल शॉकींना आली होती. यासाठी कोल्हापूरच्या प्रत्येक फुटबॉल शौकिनांची पावले राजर्षी शाहू स्टेडियमकडे वळली. मैदानाचा अधिकतर भाग प्रेक्षकांनी व्यापला होता. एकीकडे हुल्लडबाजीमुळे बंद झालेला फुटबॉल हंगाम पुन्हा सुरू होत असल्याची उत्सुकता सर्वच घटकांमध्ये होती. खेळाडूंसह प्रेक्षक हंगाम पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत होते. अनेक मान्यवर आणि दिग्गज हंगाम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नात होते. स्पर्धेतील विजयी संघास लाखाचे, तर उपविजेत्यास 75 हजारांचे रोख बक्षीसाची घोषणा के.एस.ए.चे अध्यक्ष मालोजीराजे यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com