IPL 2019 : रसेलच्या वादळात बंगळूर उद्ध्वस्त

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

बंगळूर : दोनशेपार धावसंख्या करुनही गोलंदाजांना विकेट पडत नव्हत्या.. अखेर गोलंदाजांनी लागोपाठ विकेट पडल्या आणि आता आरसीबी जिंकणार असे वाटू लागले.

आयपीएल 2019 : बंगळूर : दोनशेपार धावसंख्या करुनही गोलंदाजांना विकेट पडत नव्हत्या.. अखेर गोलंदाजांनी लागोपाठ विकेट पडल्या आणि आता आरसीबी जिंकणार असे वाटू लागले.. तेवढ्यातच आंद्रे रसले नावाचे वादळ पुन्हा घोंघावले आणि हाता तोंडाशी आलेला बंगळूर विजय त्याने खेचून नेला. त्याने 13 चेंडूंत केलेल्या 48 धावांच्या जोरावर कोलकता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला पाच गडी राखून बाद केले. 

बंगळूरने दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना ख्रिस लिनने 31 चेंडूंमध्ये 43 धावांची खेळी केली. त्यानंतर रॉबिन उथप्पा आणि नितीश राणा यांनीही थोड्या थोड्या धावा जमा करत धावफलक हलता ठेवला. मात्र हे दोघे आणि दिनेश कार्तिक बाद झाल्यावर कोलक्याचा विजय दूर जातोय असे वाटू लागले. 

रसेलने मात्र, सात षटकार आणि एक चौकार मारत केवळ 13 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अखेर आज विराट कोहली आणि एबी डिव्हिलर्सला सूर गवसला आणि त्याचमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने कोलकता नाईट रायडर्सला 206 धावांचे आव्हान दिले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolkata Knight Riders wins against Royal Challengers Bangalore