
बातुमी (जॉर्जिया): डी. गुकेश याने पुरुषांमध्ये जगज्जेता होण्याचा मान संपादन केल्यानंतर आता महिला विभागातही भारतच विश्वविजेता होणार हे निश्चित झाले आहे. कोनेरू हंपी हिने चीनच्या लेई टिंगजी हिला उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत करून बुद्धिबळ विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.