नताशा वहिनीचं स्वागत करताना कृणाल म्हणाला, "वेडेपणा करण्यासाठी...''

टीम ई-सकाळ
गुरुवार, 2 जानेवारी 2020

या अगोदर हार्दिकचे नाव बॉलिवूडमधील ईशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशी जोडले गेले होते.

भारतीय क्रिकेट विश्वातील कृणाल आणि हार्दिक पंड्या हे पंड्या बंधू हे आपल्या स्टाईल आणि खेळीमुळे ओळखले जातात. कालच हार्दिक पंड्याने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकला प्रपोज केले आणि एन्गेज झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही गोड बातमी दिल्यानंतर सगळीकडे चर्चेला उधाण आले होते. अनेक क्रिकेटपटू आणि हार्दिक-कृणाल यांच्या फ्रेण्डसर्कलमधील अनेकांनी या नव्या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. कृणालनेही आपला भाऊ आणि वहिनीला थोड्या हटक्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Show stopper and show stealer You set the ramp on fire bhai @hardikpandya93

A post shared by Krunal Pandya (@krunalpandya_official) on

- Video : क्रिकेट खेळण्याची त्याची जिद्द बघून सचिन झाला भावूक!

कृणालने म्हटले आहे की, ''हार्दिक आणि नताशा तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन. नताशा आमच्या या क्रेझी कुटुंबात वेडेपणा करण्यासाठी तुझं स्वागत आहे. तुम्हा दोघांना खूप प्रेम.'' 

- हार्दिक पंड्याने काल दिली प्रेमाची कबुली; आज केलं तिला प्रपोज!

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब आहे. 31 डिसेंबरला हार्दिकने नताशासोबतच्या नात्याची कबुली दिली. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने नताशाला प्रपोजही केले. ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्तान'' असे कॅप्शन हार्दिकने एन्गेजमेंटच्या फोटोला दिले होते. त्यानंतर आता हे कपल विवाह बंधनात कधी अडकणार याची चर्चा माध्यमात सुरू झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Brothers that train together, slay together 

A post shared by Krunal Pandya (@krunalpandya_official) on

- FlashBack 2019 : क्रिकेटमध्ये दांडी; इतर खेळांमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी!

दरम्यान, या अगोदर हार्दिकचे नाव बॉलिवूडमधील ईशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशी जोडले गेले होते. मात्र, हार्दिकने नताशासोबतचा फोटो टाकून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan.  01.01.2020  #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krunal Pandya congratulates brother Hardik Pandya and Natasa Stankovic