
Kuldeep Sen Making Debut For Team India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका (IND vs BAN) सुरू झाली आहे. पहिला सामना ढाका येथे खेळवला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजांसह उतरला आहे. वेगवान गोलंदाज कुलदीप सेनलाही टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. भारताकडून वनडे खेळणारा तो 250 वा खेळाडू ठरला आहे.
कोण आहे कुलदीप सेन?
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. त्याचबरोबर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. 26 वर्षीय कुलदीपने 2018 मध्ये देशांतर्गत पदार्पण केले. तो आतापर्यंत 13 लिस्ट ए सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 25 विकेट घेतले आहेत. याशिवाय 17 प्रथम श्रेणी आणि 20 टी-20 सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनचाही भाग राहिला आहे.
वडील चालवतात सलून
कुलदीप सेन हा एमपीच्या रीवा जिल्ह्यातील हरिहरपूरचा रहिवासी आहे. त्याचे वडील सलून चालवतात. कुलदीप हा तीन भावांमध्ये मोठा आहे. त्याचा एक भाऊ मध्य प्रदेश पोलिसात निवडला गेला आणि दुसरा भाऊ कोचिंग चालवतो. रेवांचल एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला कुलदीप 145 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने सतत गोलंदाजी करू शकतो.
बांगलादेश विरुद्ध भारताच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. फॉर्ममध्ये झगडत असलेल्या यष्टिरक्षक ऋषभ पंतला संघातून बाहेर काढण्यात आले आहे. आता तो कसोटी मालिकेपूर्वी संघात सामील होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.