IND vs SA : कुलदीप - सिराज सगळे गोलंदाज 'एकदम ओके', आफ्रिका 100 च्या आत घरात

Kuldeep Yadav Good Bowling
Kuldeep Yadav Good BowlingESAKAL
Updated on

India Vs South Africa 3rd ODI : भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि निर्णयाक सामन्यात 99 धावात गुंडाळत सामन्यावर भारताची पकड मजबूत केली. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी पोषक खेळपट्टीचा चांगला फायदा उचलला. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर शाहबाज अहदम, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. आफ्रिकेकडून क्लासेननने सर्वाधिक 34 धावा केल्या.

Kuldeep Yadav Good Bowling
Kanak Indersingh Gurjar : अवघ्या 10 वर्षाच्या मुलीने उचलले 102.5 किलो वजन

पावसाच्या छायेखाली सुरू झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराजने क्विंटन डिकॉक (6) आणि जानेमान मलानला (15) स्वस्तात बाद करत सार्थ ठरवला.

दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर गेल्या सामन्यातील हिरो रीझा हेंड्रिक्स आणि एडेन माक्ररम यांनी सावध फलंदाजी करण्यास सुरूवात केली. मात्र सिराजने हेंड्रिक्सला 3 धावांवर बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. सिराजने शॉर्टबॉलचा हुशारीने वापर करत आधी मलान आणि नंतर हेंड्रिक्सला बाद केले. त्यानंतर शाहबाज अहमदने माक्ररमला 9 धावांवर बाद करत चौथा धक्का दिला.

दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 बाद 43 धावा अशी झाली होती. काळजीवाहू कर्णधार डेव्हिड मिलर क्रिजवर आला. मात्र वॉशिंग्टन सुंदरने त्याला 7 धावांवर त्रिफळा उडवत मालिकेत नाबाद राहण्याची मिलरची परंपरा खंडित केली. आफ्रिकेचा निम्मा संघ 66 धावात माघारी गेल्यानंंतर कुलदीप यादवने फेलुकवायोला 5 धावांवर बाद करत आफ्रिकेचा पाय अजूनच खोलात नेला. त्यानंतर शाहबाज अहमदने हैनरिच क्लासेननची 34 धावांची झुंजार खेळी संपवत आफ्रिकेची अवस्था 7 बाद 93 धावा अशी केली.

Kuldeep Yadav Good Bowling
BCCI President : गांगुली शर्यतीतून बाहेर! रॉजर बिन्नीपासून ते जय शाहपर्यंत हे दिग्गज मैदानात

यानंतर कुलदीप यादवने 26 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर फॉर्ट्युनला 1 धावेवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एर्निच नॉर्त्जेचा शुन्यावर त्रिफळा उडवला. कुलदीप यादव हॅटट्रिक चान्सवर होता. एन्गिडीने कुलदीपचा पुढचा चेंडू अडवला आणि हॅटट्रिक चान्स हुकला. मात्र पुढच्या षटकात कुलदीपने मार्को जेनसेला 14 धावांवर बाद करत आफ्रिकेचा डाव 99 धावांवर संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com