

KUMKUM MOHOD GOLD MEDAL ASIAN GAMES 2026
esakal
KUMKUM MOHOD GOLD MEDAL ASIAN GAMES 2026: आशियाई गेम्स २०२६ मध्ये अमरावतीच्या एका १७ वर्षांच्या लेकीने इतिहास रचला आहे. अमरावतीच्या गोसावी कॉलनीत राहणाऱ्या कुमकुम अनिल मनोहर मोहोड हिने तिरंदाजीच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे.
आशियाई खेळांच्या इतिहासात महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी कुमकुम पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिच्या या कामगिरीसोबतच २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी भारताचा कोटा देखील पक्का झाला आहे.