BAN vs SL : कुसल भिडला! मात्र महेदीच्या 'नो बॉल'ने लंका पोहचली सुपर 4 मध्ये

Kusal Mendis Fight Back Sri Lanka Defeat Bangladesh  Reached Super 4 In Asia Cup 2022
Kusal Mendis Fight Back Sri Lanka Defeat Bangladesh Reached Super 4 In Asia Cup 2022esakal

Sri Lanka vs Bangladesh 5th Match Group B : आशिया कप ग्रुप B मधील बांगलादेश - श्रीलंका हाय व्होल्टेज सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 2 विकेट्सनी पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. बांगलादेशने श्रीलंकेविरूद्ध 184 धावांचा आव्हान ठेवले होते. हे आव्हान लंकेने 19.2 षटकात 8 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. या विजयाचे श्रेय कुसल मेंडीसला जाते. त्याने 37 चेंडूत 60 धावांची झुंजार खेळी केली. त्याला बांगलादेशने काही जीवनदान देखील दिली. कर्णधार दसुन सनकाने 33 चेंडूत 45 धावा करत देखील विजयासाठी झुंज दिली.

मात्र शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज असताना असिथाने पाचव्या चेंडूवर चौकार मारत सामना चार चेंडूत 3 धावा असा आणला. चौथ्या चेंडूवर महेदीने नो बॉल टाकला त्यावर लंकाने दोन धावा पळून काढल्या आणि सामना 4 चेंडू शिल्लक असतानाच आपल्या खिशात टाकला. बांगलादेशकडून एबादत हुसैनने 3 तर टस्कीन अहमदने 2 विकेट घेत लंकेला हादरे दिले. (Kusal Mendis Fight Back Sri Lanka Defeat Bangladesh Reached Super 4 In Asia Cup 2022)

Kusal Mendis Fight Back Sri Lanka Defeat Bangladesh  Reached Super 4 In Asia Cup 2022
SL vs BAN : एकाचेही अर्धशतक नाही! तरी बांगलादेशने केल्या 183 धावा

बांगलादेशचे 184 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही सलामी 45 धावांपर्यंत पोहचली असताना एबादत हुसैनने पथूम निसंकाला 20 धावांवर बाद केले. त्यानंतर एबादतने लंकेच्या चरिथ असलंका (1) आणि दनुष्का गुणतिलकाला (11) स्वस्तात माघारी धाडले. मात्र जरी श्रीलंकेने विकेट पडत असल्या तरी त्यांची धावगती चांगली राखली होती. यात कुसल मेंडीसचा मोठा वाटा होता.

मात्र दुसऱ्या बाजूने त्याला म्हणावी तशी साथ मिळत नव्हती. भानुका राजपक्षा 1 धावेची भर घालून परतला होता. यानंतर मेंडीसने कर्णधार दसुन शनकासोबत भागीदारी रचत सामना जिवंत ठेवला होता. दरम्यान, मेंडीसने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र त्याती ही खेळी अनुभवी मुस्तफिजूरने 60 धावांवर संपवली. आत दमदार क्षेत्ररक्षण करणाऱ्या टस्कीनने त्याचा झेल टिपला.

Kusal Mendis Fight Back Sri Lanka Defeat Bangladesh  Reached Super 4 In Asia Cup 2022
T20 World Cup: उलटी गिनती सुरू! काही दिवसांत जाहीर होणार भारतीय संघ! 'या' खेळाडूंचे स्थान निश्चित

मेंडीस बाद झाल्यानंतर हसरंगा देखील 2 धावा करून बाद झाला. दरम्यान, कर्णधार शनकाने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 33 चेंडूत 45 धावांची खेळी केली. मात्र 18 व्या षटकात त्याला मेहदी हसनने बाद करत श्रीलंकेला मोठा धक्का दिला. शनका बाद झाल्यानंतर चमिका करूणारत्नेने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र 10 चेंडूत 16 धावा केल्यानंतर शाकिबने त्याला धावबाद केले.

शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज असताना असिथाने पाचव्या चेंडूवर चौकार मारत सामना चार चेंडूत 3 धावा असा आणला. चौथ्या चेंडूवर महेदीने नो बॉल टाकला त्यावर लंकाने दोन धावा पळून काढल्या आणि सामना आपल्या खिशात टाकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com