Kylian Mbappe: वर्ल्डकप जिंकू शकला नाही मात्र मेस्सीच्या हातून गोल्ड बूट घेतला हिसकावून

लिओनेल मेस्सीने जिंकला गोल्डन बॉल, एमबाप्पेला मिळाला गोल्डन बूट..
Kylian Mbappe Record
Kylian Mbappe Recordेोकोत

Kylian Mbappe Record : लिओनेल मेस्सीच्या संघ अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून फिफा विश्वचषक 2022चे विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिनाने 36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हे विजेतेपद पटकावले आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला. या सामन्यात फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू एमबाप्पेने हॅटट्रिक केली. या हॅट्ट्रिकसह त्याने ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू पेलेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Kylian Mbappe Record
Lionel Messi Wife: मॅच हाय का लगीन.. मेस्सीची ट्रॉफी उचलायला आख्ख घरदार..

विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला प्रतिष्ठित गोल्डन बूट विजेतेपद मिळते. 2022 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तीन गोल करत फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेने गोल्डन बूट जिंकला. तत्पूर्वी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीनेही अंतिम फेरीत दोन गोल केले आणि सात गोलांसह गोल्डन बूटच्या दावेदारांमध्ये तो होता, परंतु तो एम्बाप्पेवर मात करू शकला नाही. गोल्डन बूट विजेत्याने एकाच विश्वचषकात सहाहून अधिक गोल करण्याची 44 वर्षे आणि 11 विश्वचषकातील ही दुसरी वेळ आहे.

Kylian Mbappe Record
FIFA WC22: अर्जेंटिनावर पैशांचा पाऊस! जाणून घ्या कोण किती झालं मालामाल

अधुरे स्वप्न पूर्ण करणाऱ्या लिओनेल मेस्सीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कार पटकावला, तर फ्रान्सच्या केलियन एमबाप्पेने सर्वाधिक गोल करत. कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करून 36 वर्षांनंतर विश्वविजेता बनला. फ्रान्सच्या 23 वर्षीय एमबाप्पेने फायनलमध्ये हॅट्ट्रिकसह आठ गोल करत त्याला गोल्डन बूट मिळवून दिला. अर्जेंटिनाच्या एमिलियानो मार्टिनेझने अंतिम फेरीत दोन पेनल्टी वाचवत सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा गोल्डन ग्लोव्हज पुरस्कार जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com