Australian Open 2025: लक्ष्यला मोसमातले पहिले विजेतेपद; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, दोन गेममध्ये मोहीम फत्ते
Lakshya Sen Clinches Australian Open Title: भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरी विजेतेपद जिंकले. जपानच्या युशी तनाकावर २१-१५, २१-११ असा सरळ गेममध्ये विजय मिळवला.
सिडनी : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जपानच्या युशी तनाकाचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. त्याचबरोबर विजेतेपदाचा दुष्काळ संपवताना यंदाच्या वर्षातील पहिले पुरुष एकेरीचे अजिंक्यपद मिळवले.