

Lakshya Sen has secured qualification for the BWF World Tour Finals after Kidambi Srikanth defeated Koki Watanabe at the Hong Kong Open.
esakal
नवी दिल्ली, : किदांबी श्रीकांत हा लक्ष्य सेनच्या मदतीला धावून आला. किदांबी श्रीकांत याने बुधवारी कोकी वातानबेला पराभूत केल्यामुळे लक्ष्य सेन याचे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स या जागतिक स्पर्धेचे तिकीट निश्चित झाले. या स्पर्धेमध्ये क्रमवारीतील अव्वल आठ क्रमांकावरील खेळाडूंना पात्रता मिळते. लक्ष्य सेन व कोकी वातानबे यांच्यामध्ये चुरस होती
मात्र किदांबी श्रीकांत याने हाँगकाँग ओपन या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कोकी वातानबेला हरवून लक्ष्य सेनचा मार्ग मोकळा करून टाकला. हायलो ओपन आणि कुमामोटो मास्टर्स जपान या स्पर्धांमध्ये लागोपाठ विजेतेपद मिळवून लक्ष्य सेनने अनपेक्षितरीत्या वर्ल्ड टूर क्रमवारीत सहावे स्थान गाठले होते,