Lalit Babu And Madhesh Kumar: ललित बाबू आणि कॅंडिडेट मास्टर मधेश कुमार यांनी ऑरियन प्रो मुंबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. ललित बाबूने ४ लाख रुपये आणि मधेशने २ लाख रुपये बक्षीस मिळवले.
मुंबई : वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे झालेल्या ऑरियन प्रो मुंबई आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर आणि ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर ललित बाबू आणि कॅंडिडेट मास्टर मधेश कुमार यांनी विजेतेपद पटकावले.