
मुंबई : भारताचे ग्रँडमास्टर ललित बाबू, नीलोप्तल दास यांनी आठव्या फेरीमध्ये विजय मिळवत ऑरियन प्रो मुंबई आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर घरिब्यान मामीकोन याच्यासह संयुक्तरीत्या आघाडी घेतली. यामुळे जेतेपदासाठी खेळाडूंमध्ये कमालीची चुरस दिसून येत आहे.