यॉर्करकिंग मलिंगा बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या ODI नंतर घेणार निवृत्ती 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

यॉर्करकिंग लसिथ मलिंगा श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या एकदविसीय सामन्यानंतर निवृत्ती घेणार आहे. हा सामना 26 जुलैला कोलंबोमध्ये होणार आहे. 

कोलंबो : यॉर्करकिंग लसिथ मलिंगा श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या एकदविसीय सामन्यानंतर निवृत्ती घेणार आहे. हा सामना 26 जुलैला कोलंबोमध्ये होणार आहे. 

मलिंगाच्या निवृत्तीची घोषणा श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने पत्रकार परिषदेत केली. यावर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेतच त्याने विश्वकरंडकानंतर निवृत्त होण्याचे जाहिर केले होते. मात्र कदाचित घरच्या मैदानावर अखेरची गोलंदाजी करण्यासाठी तो बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी थांबला असावा. 

''तो पहिल्या सामन्यानंतर खेळणार नाही. त्या सामन्यानंतर तो निवृत्त होणार आहे. त्याने मला असंच सांगितले आहे. त्याने निवड समितीला काय सांगितले आहे याची मला कल्पना नाही मात्र, त्याने मला पहिल्या सामन्यानंतर खेळणार नसल्याचे सांगितले आहे,'' अशी माहिती करुणारत्नेने दिली. 

त्याने या सामन्यानंतर निवृत्ती घेतली तर तो श्रीलंकेसाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरेल. त्याने आतापर्यंत 335 बळी घेतले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lasith Malinga To Retire After First ODI Against Bangladesh