क्रिकेटचा देव स्वरसम्राज्ञींना मानायचा आई

LataMangeshkar And   SachinTendulkar
LataMangeshkar And SachinTendulkarSakal

देशाची स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लाखो चाहत्यांना आपल्या आवाजातील गाण्यावर प्रेम बरसायला भाग पाडणाऱ्या लता दीदी या क्रिकेटच्या फार मोठ्या चाहत्या होत्या. सध्याच्या घडीला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयलाही (BCCI) त्यांनी मदत केली होती. 1983 मध्ये भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी लता दीदींनी कोणतेही मानधन न घेता संगीत कार्यक्रम केला होता. यातून खेळाडूंना प्रत्येकी 1-1 लाख रूपये बक्षीस मिळाले होते.

लता दीदी जेवढ्या क्रिकेटवर प्रेम करायच्या तेवढेच प्रेम त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) करायच्या. त्या सचिनच्या मोठ्या फॅन होत्या. कोणाच्या माघारी कुणाबद्दलही वाईट न बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश होता, असे लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. एवढेच नाही तर सचिन विरोधात कोणी काही बोलू नका तो तुम्हाला कधी निराश करणार नाही, हे त्यांचे विधानही चांगलेच गाजले होते.

LataMangeshkar And   SachinTendulkar
भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला पितृशोक

मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर त्यांना आईच मानायचा. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टरच्या आयुष्यावर आधारित 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' चित्रपट प्रदर्शित झाला होता. यावेळी लता दीदींनी एक खास ट्विट केले होते. मैदानात ज्याप्रमाणे चौकार मारता तसा चित्रपटीही हीट ठरेल, अशी भावना लता मंगेशकरांनी व्यक्त केली होती. यावर मास्टर ब्लास्टर सचिनने खास रिप्लाय दिला होता. आईच्या आशिर्वादाशिवाय चौक्यावर चौका मारणं शक्य नाही, असे म्हणत सचिनने लता दीदींचा उल्लेख आई असा केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com