Commonwealth Games 2022 : लॉन बॉलमध्ये भारताचे रौप्य पदक पक्के: महिला संघाने रचला इतिहास

lawn Ball Indian Women Team Conformed Silver Medal Beat New Zealand In Semi Final In Commonwealth Games 2022 At Birmingham
lawn Ball Indian Women Team Conformed Silver Medal Beat New Zealand In Semi Final In Commonwealth Games 2022 At BirminghamEsakal

Commonwealth Games 2022 : लॉन बॉल भारतीय महिला संघाने (Lawn Ball Indian Women's Team) कमाल केली. त्यांनी सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत फायनल गाठली. त्यामुळे भारताचे लॉन बॉलमध्ये रौप्य पदक (Silver Medal) निश्चित झाले आहे. आता फायनल सामना हा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 2 ऑगस्टला होणार आहे. हा सामना दुपारी 4.15 ला सुरू होईल. भारताने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 16 - 13 असा पराभव केला. याचबरोबर भारतीय संघाने पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉलमध्ये फायनल गाठून इतिहास रचला.

lawn Ball Indian Women Team Conformed Silver Medal Beat New Zealand In Semi Final In Commonwealth Games 2022 At Birmingham
CWG 2022 Day 4 live: वेटलिफ्टिंगमध्ये सातव्या पदकाची आशा; अजय सिंगचा सामना सुरू

भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी अजून एक पदक पक्के केले. भारताने आतापर्यंत सहा पदके जिंकली होती. ही सर्व पदके वेटलिफ्टर्सनी जिंकून दिली होती. मात्र आता लॉन बॉलमध्ये भारतीय महिला संघाने आपले रौप्य पदक निश्चित केले. भारतीय लॉन बॉल महिला संघाला अजूनही आपल्या पदकाचा रंग बदलण्याची चांगली संधी आहे. त्यांचा मुकाबला आता दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. जर भारतीय महिला संघाने फायनलमध्ये विजय मिळवला तर ते सुवर्ण पदकाला गवसणी घालतील. लॉन बॉल भारतीय संघात रूपा राणी तिर्की, नयनमोनी सैकिया, लवली चौबे आणि पिंकी सिंग यांचा समावेश आहे.

lawn Ball Indian Women Team Conformed Silver Medal Beat New Zealand In Semi Final In Commonwealth Games 2022 At Birmingham
IND vs WI: रोहित शर्मा अँड टीमला मिळत नाहीय अमेरिकेचा व्हिसा

भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत 3 सुवर्ण पदके 2 रौप्य पदके तर 1 कांस्य पदक पटकावले आहे. ही सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये जिंकली आहेत. याचबरोबर 81 किलो वजनीगटात सध्या अजय सिंह देखील आपली दावेदारी सादर करत आहे. यादरम्यानच भारताच्या लॉन बॉल महिला संघाने सेमी फायनलमध्ये विजय मिळवत आपले रौप्य पदक पक्के करत भारताला सातवे पदक मिळवून दिले. आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या फायनल सामन्यात विजय मिळवत भारतला या पदकाचा रंग बदलण्याची संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com