CWG 2022 Day 4 : ज्यूदोत सुशिला रौप्य, कांस्यची कमाई तर वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य कमाई

Commonwealth Games 2022 Live
Commonwealth Games 2022 Liveesakal

Commonwealth Games 2022 day 4 : भारतीय खेळाडूंनी बर्मिंगहॅममध्ये चौथ्या दिवशी देखील आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. भारताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत सहा पदके जिंकली असून ही सर्व पदके वेटलिफ्टिंग मधून आली आहे. आज चौथ्या दिवशी भारतीय महिला लॉन बॉल संघाने इतिहास रचत राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. त्यांनी रौप्य पदक पक्के केले. त्याचबरोबर महिला ज्यूडो स्पर्धेत 48 किलो महिला वजनी गटात सुशिला देवीने रौप्य पदक पटकावले. ज्यूदोमध्येच पुरूष 60 किलो वजनी गटात विजय कुमार यादवने भारतला कांस्य पदक पटकावून दिले. यानंतर अखेरच्या क्षणी वेटलिफ्टर हरजिंदर कौरने 71 किलो वजनी गटात भारताला कांस्य पदक मिळवून देत पदक संख्या 9 वर नेली. वेटलिफ्टिंगमधून भारताला 7 वे पदक मिळाले.

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कांस्य 

भारताची वेटलिफ्टर हरजिंदर कौरने कांस्य पदकाची कमाई केली. 71 किलो वजनी गटात हरजिंदर कौरने एकूण 212 किलो वजन उचलून भारताला कांस्य पदक मिळवून दिले. तिने क्लीन अँड जर्कमध्ये 119 तर स्नॅचमध्ये 93 किलो वजन उचलले.

 हॉकी : भारत - इंग्लंड सामना बरोबरीत

पुरूष हॉकीच्या ग्रुप ब मधील सामन्यात भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यातील सामनना 2 - 2 असा बरोबरीत राहिला. भारताने सामन्यात 4 - 2 अशी आघाडी घेतली होती. मात्र इंग्लंडने जोरदार मुसंडी मारत सामना 4 - 4 असा बरोबरीत आणला.

ज्यूदोमध्ये दोन पदके!

सुशिला देवी पाठापोठ ज्यूदोमध्ये पुरूष 60 किलो वजनीगटात भारताच्या विजय कुमार यादवने कांस्य पदक पटकावले.

ज्यूदो : भारताला रौप्य पदक

ज्यूदो महिला 48 किलो वजनी गटात भारताने रौप्य पदकाची कमाई केली आहे. भारताच्या लिकमोबाम सुशिला देवीचा दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबोईने अंतिम सामन्यात पराभव केला. सुशिला देवीने मॉरिशियसच्या मोरांडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी भारताचे अजून एक पदक निश्चित झाले.

स्क्वाश : सौरभ घोषाल सेमी फायनलमध्ये

स्क्वाश पुरूष एकेरीच्या सामन्यात भारताच्या सौरभ घोशालने स्कॉटलंडच्या ग्रेग लोबानचा 11-5, 8-11, 11-7, 11-3 असा पराभव करत सेमी फायनल गाठली.

बॉक्सिंग : 57 किलो पुरूष वजनी गटात हुसामुद्दीने उपांत्यपूर्व फेरीत 

भारताचा 57 किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दीनने बांगलादेशच्या मोहम्मद सलिम हुसैनचा 5 - 0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचबरोबर 51 किलो वजनी गटात अमित पांघलने विजयी सुरूवात केली.

ज्यूडो : लिकमाबाम सुशिला देवीने रौप्य पदक केले निश्चित

ज्यूडोमध्ये 48 किलो महिला वजनीगटात भारताच्या लिकमाबाम सुशिला देवीने मॉरिशियसच्या मोरांडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. भारताचे अजून एक पदक निश्चित झाले.

अजय तिसऱ्या प्रयत्नात ठरला अपयशी

अजय सिंगला 81 किलो वजनी गटात पदक जिंकता आले नाही. स्नॅच राऊंडमध्ये 143 किलो वजन उचलल्यानंतर त्याला क्लीन अँड जर्कमध्ये 176 किलो वजन उचलण्यात यश आले. मात्र, पदकासाठी त्याचे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत. अजय 319 किलो वजनासह चौथ्या स्थानावर राहिला. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

क्लीन अँड जर्कमध्ये अजय सिंगची शानदार सुरुवात

अजय सिंगने क्लीन अँड जर्कमध्ये शानदार सुरुवात केली आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात 172 किलो वजन उचलले आहे.

lawn bowls: भारताने न्यूझीलंडचा पराभव करून पदक केले निश्चित

भारतीय महिला संघाने लॉन बॉलमध्ये पदक निश्चित केले आहे. महिला दलात भारताने न्यूझीलंडचा 16-13 असा पराभव केला. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीतील पदक निश्चित केले. सुरुवातीला भारतीय संघ 6-1 ने पिछाडीवर होता पण दमदार पुनरागमन करत पदक निश्चित केले. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अजयने स्नॅच फेरीनंतर तिसऱ्या स्थानवर

81 किलो वजनी गटात स्नॅच फेरीचे सामने पूर्ण झाले आहेत. इंग्लंडचा ख्रिस मरे सध्या 144 किलो वजनासह पहिल्या स्थानावर आहे. भारताचा अजय सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा काईल ब्रुस हे 143-143 किलो वजनासह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. कॅनडाचा निकोलस 140 किलो वजनासह तिसऱ्या स्थानावर आहे.

अजय सिंगने स्नॅच फेरीच्या तिसऱ्या प्रयत्नात 143 किलो वजन उचलले

वेटलिफ्टर अजय सिंगने स्नॅच फेरीच्या तिसऱ्या प्रयत्नात 143 किलो वजन उचलले आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात 137 किलो तर दुसऱ्या प्रयत्नात 140 किलो वजन उचलले. अशाप्रकारे स्नॅच फेरीत त्याचा स्कोअर 143 किलो आहे.

अजय सिंगने दुसऱ्या प्रयत्नात 140 किलो वजन उचलले

यावेळी अजय सिंग अतिशय शानदार लयीत दिसत आहे. स्नॅचच्या दुसऱ्या प्रयत्नात त्याने यशस्वीरित्या 140 किलो वजन उचलले आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये लढत सुरू

वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 81 किलो वजनी गटात अजय सिंगची स्पर्धा सुरू झाली आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात 137 किलो वजन उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

weightlifting : अजय सिंगचा सामना काही वेळेतच सुरू 

भारतीय वेटलिफ्टर अजय सिंग लवकरच 81 किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या दावेदारांपैकी एक असेल. महिलांमध्ये हरजिंदर कौर 71 किलो वजनी गटात नशीब आजमावेल.

CWG 2022: बॉक्सर निखत जरीनकडून भारताला सुवर्ण पदकाची आशा

जागतिक चॅम्पियन निखत जरीन व टोकियो ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या लोवलीना बागेहिन यांनी आपापल्या सामन्यांत विजय मिळवून येथे चालू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील बॉक्सिंग यातील महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. निखतने ५० किलो वजनी गटाच्या सामन्यात मोझांबिकच्या हेलेना इस्माईल बागाओला पराभूत केले; तर लोवलीनाने ७० किलो वजनी गटाच्या लढतीत एरियाना निकोल्सचा ५-० असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Srihari Nataraj : श्रीहरी नटराज कडून स्विमिंगमध्ये भारताला सुवर्णपदकाची आशा

भारतीय जलतरणपटू श्रीहरी नटराजने रविवारी येथील २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात २५.५२ सेकंदांची वेळ नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळं संपूर्ण भारतीयांच्या नजरा लक्ष श्रीहरी नटराजच्या कामगिरीवर असणार आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बॉर्डर्सवरील आपल्या वीरांचा अजय सिंगला एक खास संदेश

वेटलिफ्टर अजय सिंगला आजच्या #CommonwealthGames2022 च्या 81 किलो वजनी गटात आव्हान सादर करणार आहे, त्याच्यासाठी इंडियन आर्मी कडून त्याला खास शुभेच्छा!

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये पाहा चौथ्या दिवसाचे शेड्यूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com