Laxman Bovelekar passes away : मुंबईतील शरीरसौष्ठवातील दिग्गज लक्ष्मण बोवलेकर काळाच्या पडद्याआड

Laxman Bovelekar bodybuilding legend passes away at 85 : मुंबईच्या व्यायाम आणि शरीरसौष्ठव संस्कृतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणारे ज्येष्ठ शरीरसौष्ठव क्षेत्रातील दिग्गज लक्ष्मण बोवलेकर यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.
Laxman Bovelekar bodybuilding legend passes away at 85

Laxman Bovelekar bodybuilding legend passes away at 85

Updated on: 

मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या आणि व्यायाम संस्कृतीला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या शिलेदारांपैकी एक असलेले लक्ष्मण बोवलेकर यांची जीवनाची झुंज गुरुवारी संपली. वयाच्या ८५व्या वर्षी जोगेश्वरी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्रातील एक भक्कम आधारस्तंभ कोसळला.

Loading content, please wait...