क्रिकेट सामनाधिकारी म्हणून 'लक्ष्मी'ची पावले 

Laxmi to become umpire of Mens cricket match
Laxmi to become umpire of Mens cricket match

नवी दिल्ली : आयसीसीएच्या पुरुषांच्या एलिट पॅनेलमध्ये एकाही भारतीय पंचाला स्थान नसले तरी भारताच्या जी. एस. लक्ष्मी पुरुषांच्या सामन्यात सामनाधिकाऱ्याचे काम करून इतिहास घडवणार आहेत. परदेशातील पुरुषांच्या सामन्यात सामनाधिकारी रहाणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरणार आहेत. 

भारतात 2023 मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी शारजा क्रिकेट मैदानावर 8 तारखेपासून वर्ल्डकप लीग -2 पात्रता स्पर्धा सुरु होत आहे. या सामन्यात जी. एस. लक्ष्मी सामनाधिकारी असणार आहेत. मे महिन्यात त्यांची आयसीसी पॅनेलच्या सामनाधिकारीमध्ये समावेश करण्यात आला होता. 

51 वर्षीय लक्ष्मी यांनी 2008-9 मध्ये प्रथम देशांतर्गत महिलांच्या क्रिकेट सामन्यात पंचांचे काम केलेले होते. त्यानंतर त्यांनी महिलांच्या तीन एकदिवसीय आणि देशातील पुरुषांच्या 16 ट्‌वेन्टी-20 आणि महिलांच्या सात ट्‌वेन्टी-20 सामन्यात पंचांची जबाबदारी पार पाडलेली आहे. 

कोण आहेत लक्ष्मी 
गंदीकोटा सर्वा लक्ष्मी असे त्यांचे पूर्ण नाव असून आंध्रप्रदेशच्या राजाहुमंद्री येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे वडिल टाटा मोटर्समध्ये नोकरी करत होते. दहावीत चांगले गुण मिळाले नसल्यामुळे त्यांना जमशेदपूर महिला कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. परंतु स्पोर्टसमधील राखीव जागेमुळे त्यांना प्रवेश मिळाला. भाऊ आणि त्याच्या मित्रांबरोबर त्या क्रिकेट खेळायच्या वेगवा गोलंदाजीची त्यांच्याकडे नैसर्गिक शैली होती. त्यामुळे त्यांनी खेळाडू म्हणून प्रगती केली. त्यानंतर 19 वर्षे त्या आंध्र प्रदेशकडन देशांतर्गत क्रिकेट खेळल्या आहेत. 

हा माझ्यासाठीच नव्हे तर महिलांसाठी अभिमान आहे. आयसीसीच्या स्पर्धेत सामनाधिकारी म्हणून पहिली वहिली महिला असण्याचा हा बहुमान गौरवास्पद आहे. माझ्यानंतर अनेक महिला या क्षेत्रात पुढे येतील असा विश्‍वास आहे. 
- जी. एस. लक्ष्मी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com