'लीला चेस झिरो' चेस इंजिन बनले ग्रँड चँपियन

leela chess zero
leela chess zero

न्यूरल नेटवर्क आधारित इंजिनची कमाल

चेसडॉम आयोजित 'टॉप चेस इंजिन चँपियनशिप-सिझन १५' स्पर्धे मध्ये लीला चेस झिरो  (रेटिंग ३५८९) चेस इंजिन ने स्टॉकफिश (रेटिंग ३५८७) चेस इंजिन वर ७ गुणांच्या फरकाने मात करून ग्रँड चँपियन पद पटकावले. १०० फेऱ्यांच्या सुपरफायनल मध्ये एल.सी.झिरो ने १४ विजय, ७९ बरोबरी व ७ पराभव अशी दिमाखदार कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले. एल.सी.झिरोचे एकूण ५३.५ गुण झाले, तर स्टॉकफिशचे ४६.५ गुण झाले. या स्पर्धेत जगातील एकूण ४४ चेस इंजिननी सहभाग घेतला होता. यापूर्वी स्टॉकफिशने  सिझन ११-होदिनी विरुद्ध (+20, =78, -2), सिझन १२- कोमोडो विरुद्ध (+ 29, =62, -9), सिझन १३- कोमोडो विरुद्ध (+16, =78, -6), सिझन १४ -एल.सी. झिरो विरुद्ध (+10,  =81, -9) असे सलग चार वेळेस जगज्जेतेपद मिळवलेले असल्याने एल.सी.झिरो ची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. अर्थात सिझन १४ मध्ये स्टॉकफिशने केवळ एका गुणाच्या (५०.५ - ४९.५) फरकाने एल. सी. झिरो वर निसटता विजय प्राप्त केला होता. सिझन १४ च्या स्पर्धेत ७२ फेऱ्यां पर्यंत एल.सी.झिरोने एका गुणाची आघाडी घेतली होती. मात्र ही आघाडी एल.सी.झिरोला अखेर पर्यंत राखता आली नव्हती. उर्वरित २८ डावात स्टॉकफिशने २ डाव जिंकले आणि विश्वविजेतेपद आपल्याकडे राखले होते.
   
सिझन-१५ स्पर्धेसाठी सुद्धा नेहमी प्रमाणे स्विसलीग वा अन्य पद्धती ऐवजी 'डिव्हिजन' पद्धतीचा अवलंब करण्यात आला. फक्त चौथ्या डिव्हिजन मध्ये प्रथमच दोन भाग करण्यात आले. डिव्हिजन ४ (४अ आणि ४ ब  मध्ये प्रत्येकी १० इंजिन), डिव्हिजन ३ (६+४अ व ४ ब मधील प्रथम क्रमांकाचे एकूण २), डिव्हिजन २ (६+डिव्हिजन ३ मधील पहिले दोन), डिव्हिजन १ (६+डिव्हिजन २ मधील पहिले दोन), प्रीमियर (६+डिव्हिजन १ मधील पहिले दोन). सर्वात शक्तिशाली प्रीमियर डिव्हिजन मधील पहिल्या ८ चेस इंजिन मधून स्टॉकफिश आणि एल.सी.झिरो या दोन चेस इंजिननी सुपर फायनल साठी बाजी मारली.

प्रत्येक चाली साठी १० सेकंदाच्या वाढीव वेळे सहित १२० मिनिटे असे वेळेचे बंधन होते.  
१०० हून अधिक चाली झालेले एकूण २६ डाव झाले. बरोबरीत सुटलेला ३३ वा डाव २६२ चालीं पर्यंत रंगला. काळ्या मोहऱ्यांनिशी प्रत्येकी केवळ एका डावात विजय. हा मुख्य चिंतेचा विषय आहे. कारण येथे १९१३ मध्ये जर्मन गणितज्ञ् झर्मेलोने सिद्ध केलेल्या गणीती प्रमेयाची आठवण येते. संगणकावर बुद्धिबळ हा खेळ प्रथम संपुष्टात येईल, असे त्या सिद्ध झालेल्या प्रमेयाचे भाकीत आहे.        

* लीला चेस झिरो (संगणकीय भाषा सी++१४) आणि स्टॉकफिश (संगणकीय भाषा सी++) चेस इंजिनच्या मुक्त संगणक प्रणाली आहेत ! यामध्ये अगदी कोणीही बदल करू शकतो आणि केलेले बदल पुढे पाठवू शकतो.

स्टॉकफिश -  
*  मानवी तर्कज्ञान आधारित पटस्थितीचे मूल्यमापन. एका सेकंदात ७ कोटी चालींचा विचार करण्याची क्षमता.  
* मल्टिप्रोसेसर सिस्टीम मध्ये ५१२ सीपीयु थ्रेडस (धागे/सूत्रे) वापरू शकते.    
 कमाल परिवर्तन (ट्रान्स्पोझिशन) टेबल चौकट १२८ जी.बी.  
* सीपीयु मध्ये एकाच वेळेस एकाच ठिकाणी वेगवेगळी गुणन करणे म्हणजे मल्टिथ्रेडींग.    ती एकेमकांशी संबंधित असतीलच असे नाही.
* अत्याधुनिक अल्फा बीटा शोध तंत्राचा अवलंब. यात अधिक आक्रमक काटछाट तंत्रा बरोबर कमीत कमी वेळेत खेळी करण्याची पद्धत अवलंबलेली असल्याने तुलनेने खोलवर शोध घेण्याची क्षमता.
* प्रत्येक चाली पूर्वी २१ प्रकारची गाळणी. आणि बिटबोर्ड वापर.
 
लीला चेस झिरो -
* लीला चेस झिरो हे लीला झिरो गो यावरून घेतले आहे जे मूळ गुगलच्या अल्फा झिरो गो वरून घेतले आहे.
* गॅरी लिन्स्कॉट यांचे नेतृत्व. ज्यांनी स्टॉकफिशची देखील संगणक प्रणाली लिहिली.  
* कृत्रिम न्यूरल नेटवर्क वर आधारित. या नेटवर्कची रचना जवळपास माणसाच्या मेंदू प्रमाणे असते. मशीन लर्निंग अल्गॉरिदम (तार्किक प्रक्रिया) द्वारे स्वयं शिक्षणाची ताकद चेस इंजिनला देण्यात येते. जवळपास २० कोटी डाव खेळून रेटिंग प्राप्त. या पद्धतीत फक्त खेळाचे सर्व नियम मूळ संगणकीय प्रणाली मध्ये असतात.
* पीयुसीटी  शोध तंत्राचा वापर. (प्रेडिक्टर + अप्पर कॉन्फिडन्स बॉउंड ट्री सर्च. याला काहीजण मॉन्टे कार्लो ट्री सर्च म्हणतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com