
दिग्गज हॉकीपटू चरणजीत सिंह यांचे निधन
१९६४ सालच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या हॉकी संघाचे कर्णधार चरणजीत सिंह (Charanjit Singh) यांचे आज ( दि. २७ ) निधन झाले. हिमाचल प्रदेशमधील उनामध्ये राहत्या घरी त्यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. भारताचे हे माजी मिड फिल्डर ९० वर्षाचे होते. पुढच्या महिन्यातच त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. चरणजीत यांना पाच वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. (Legendary Indian Hockey Player Charanjit Singh Passed Away)
दरम्यान, चरणजीत सिंह यांचे चिरंजीव व्ही. पी. सिंह (V. P. Singh) यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'पाच वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांची हालचाल मंदावली होती. ते काठीच्या सहाय्याने चालत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. आज सकाळी ते आपल्याला सोडून गेले.' व्ही. पी. सिंह पुढे म्हणाले की, माझी बहीण उनामध्ये आल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
1964 च्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी (Hockey) संघाचे नेतृत्व करण्याबरोबरच चरणजीत हे १९६० च्या ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या संघाचेही भाग होते. याचबरोबर १९६२ च्या एशियन गेम्समधील रौप्य पदक विजेत्या संघातही त्यांचा समावेश होता. (1964 Tokyo Olympics gold medal-winning hockey team Captain Charanjit Singh)
Web Title: Legendary Indian Hockey Player Charanjit Singh Passed Away
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..