Video : योगींच्या राज्यात लाईव्ह मॅचमध्येच बत्ती गुल; चाहत्यांनी केला दंगा...

रविवारी लिजेंड्स क्रिकेट लीगचा सामना सुरू असताना स्टेडियममध्ये अचानक लाईट गेली.
Legends League Cricket video
Legends League Cricket videosakal

Legends League Cricket video : सध्या भारतात दोन मोठ्या मालिका सुरू आहेत. त्यापैकी एक म्हणजे लीजेंड्स क्रिकेट लीग जिथे जुने खेळाडू पुन्हा एकदा मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. लखनौच्या एकना स्टेडियमवर रविवारी याचा एक सामना खेळला गेला. जिथे लेजेंड्स क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान लाईट गेली आणि संपूर्ण मैदानात अंधार पसरला.

Legends League Cricket video
Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात, पाहा 2007 पासूनच्या जर्सी

रविवारी लिजेंड्स क्रिकेट लीगचा सामना सुरू असताना स्टेडियममध्ये अचानक लाईट गेली. सुमारे 15 मिनिटे स्टेडियममध्ये अंधार होता. हा एकना स्टेडियम प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे. स्टेडियममध्ये अंधार पडल्यानंतर प्रेक्षकांनी मोबाईलचा फ्लॅश ऑन केला. व्हिडिओ पहा...

थोडावेळ वाट पाहिल्यानंतर लाईट आली आणि त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला, पण उत्तर प्रदेशातील या स्टेडियमवर लाईव्ह मॅच सुरू असताना अशा प्रकारामुळे आयोजकांवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्टेडियममधील लाईट गेल्याबाबत यूपी पॉवर कॉर्पोरेशनकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकना स्टेडियमचा फ्लड लाइट जनरेटर सेटवरूनच चालतात, अशा परिस्थितीत येथे काही तांत्रिक बिघाड झाल्याने काही मिनिटे अंधार झाला, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com