Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात, पाहा 2007 पासूनच्या जर्सी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India Jersey

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात, पाहा 2007 पासूनच्या जर्सी

Team India Jersey : T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची नवीन जर्सी जारी केली आहे. यापूर्वी 2021 च्या टी-20 विश्वचषकासाठीही भारताची नवीन जर्सी जारी करण्यात आली होती. 2007 पासून भारतीय संघाने किती जर्सी बदल्या आहे आणि कोणत्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने कोणती जर्सी घातली होती, हे पाहू.

T20 विश्वचषक 2007 मध्ये टीम इंडियाची जर्सी फिकट निळ्या रंगाची होती. भारतीय संघाने बहुतेक वेळा या रंगाची जर्सी परिधान केली आहे. ही जर्सी भारतासाठी खूप लकी ठरली होती, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जबरदस्त खेळ दाखवत जेतेपद पटकावले होते.

2009 च्या T20 विश्वचषकात भारतीय संघाची जर्सी गडद निळ्या रंगाची होती. जर्सीची कॉलर फिकट निळ्या ऐवजी गडद केशरी रंगाची होती. यावेळी भारताची कामगिरी विशेष राहिली नाही आणि पाकिस्तानच्या संघाने विजेतेपद पटकावले.

2010 च्या T20 विश्वचषकाची जर्सी देखील 2009 मध्ये वापरलेल्या जर्सीसारखीच होती. ते निळ्या आणि केशरी रंगात बनवले होते. यासोबतच एका बाजूला भारताच्या ध्वजाचे तीन रंग होते.

2012 च्या T20 विश्वचषकाची जर्सी भारताने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात वापरण्यात आली होती. त्याच्या कॉलरवर केशरी पट्टी आणि खांद्याजवळ नारिंगी रंगाची पट्टी होती. याशिवाय जर्सीच्या काठावर तिरंग्याची पट्टी देण्यात आली होती.

2014 च्या T20 विश्वचषकातही भारताची जर्सी फिकट निळ्या रंगाची होती. यावेळी खांद्याजवळ गुलाबी, पांढरा आणि हिरवा पट्टा होत्या. तसेच खालच्या भागात गुलाबी रंगाची पट्टी होती. यावेळी भारताने शानदार खेळ दाखवत अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र जेतेपदाच्या लढतीत भारताचा पराभव करून श्रीलंका संघ प्रथमच चॅम्पियन बनला.

2016 च्या T20 विश्वचषकात भारताची जर्सी निळी आणि केशरी होती. भारताची जर्सी खांद्याजवळ निळ्या रंगाची होती आणि पुढच्या बाजूला केशरी पट्टे होत्या. मात्र जर्सीच्या अंडरसाइडचा रंग फिका झाला होता. यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभूत होऊन बाद झाला होता. वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

गेल्या विश्वचषकात भारताने गडद निळ्या रंगाची जर्सी घातली होती. त्यात मध्यभागी हलक्या पांढऱ्या रेषा होत्या, त्या प्रेक्षकांचा पाठिंबा दर्शवत होत्या. यावेळी भारताची कामगिरी सर्वात वाईट होती आणि टीम इंडियाला उपांत्य फेरीतही पोहोचता आले नाही. न्यूझीलंडला हरवून ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. 

Web Title: Team India T20 World Cup Jersey Last 7 Wc From 2007 To 2022 Ms Dhoni Virat Kohli Rohit Sharma Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..