Sreesanth Vs Gambhir
Sreesanth Vs GambhirESAKAL

Sreesanth Vs Gambhir : लेजंड लीग क्रिकेटनं श्रीसंतलाच धाडली नोटिस; गंभीरवर आरोप करणारे व्हिडिओ आधी काढून टाक त्यानंतरच...

Sreesanth Vs Gambhir : भारताचे दोन माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्यात लेजंड लीग क्रिकेटच्या सामन्यावेळी भांडले होते. त्यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत गौतम गंभीरवर गंभीर आरोप केले. गौतम गंभीरने मॅच फिक्सर म्हणत शिवीगाळ केल्याचा दावा श्रीसंतने केला.

मात्र आता या प्रकरणात एक ट्विट्स आला आहे. खद्द लेजंंड लीग क्रिकेटनेच याची दखल घेतली असून एस. श्रीसंतला नोटिस पाठवण्यात आली आहे.

Sreesanth Vs Gambhir
ICC Pitch Rating : आयसीसीनं दिला दणका! वर्ल्डकप फायनल, सेमी फायनलची खेळपट्टी ही...

लेजंड लीग क्रिकेटमधील 6 डिसेंबरला गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यावेळी भारताचे दोन माजी खेळाडू एस. श्रीसंत आणि गौतम गंभीर मैदानावरच एकमेकांना भिडले होते. यावेळी श्रीसंतने गौतम गंभीरवर सामन्यावेळी त्याला फिक्सर म्हणून संबोधले अन् शिवीगाळ देखील केल्याचा आरोप केला होता. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत श्रीसंतने हे आरोप केले. त्यावर गंभीरने एक क्रिप्टिक ट्विट केले होते.

दरम्यान, या प्रकरणात आता लेजंड लीग क्रिकेटचे कमिशनर यांनी त्वरित लक्ष घातले आहेत. त्यांनी श्रीसंतला कायदेशीर नोटिस पाठवली असून त्याच्यावर टी 20 स्पर्धेच्या कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

Sreesanth Vs Gambhir
MS Dhoni : जर त्यानं 20 किलो वजन कमी केलं तर... धोनी कोणत्या अफगाणी खेळाडूला चेन्नईत घेणार होता?

या नोटिसीत सांगण्यात आलं आहे की ज्यावेळी श्रीसंत गंभीरवर टीका करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवेल तेव्हाच त्याच्यासोबत चर्चा केली जाईल.

श्रीसंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन ते तीन व्हिडिओ शेअर करत सामन्यावेळी गंभीरने त्याला मॅच फिक्सर म्हणत शिवीगाळ केल्याच आरोप केला होता. त्यानंतर गौतम गंभीरने एक क्रिप्टिट ट्विट केलं होते.

गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'ज्यावेळी संपूर्ण जग लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्नशील असतं त्यावेळी तुम्ही फक्त हसा.' दरम्यान, श्रीसंत आणि गंभीरच्या मैदनावरील वादावेळी मध्यस्थी करणाऱ्या अंपायर्सनी आपला अहवाल दिला आहे. त्या अहवालात श्रीसंतच्या दाव्याबाबत कोणताही उल्लेख नाहीये.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com