एकाच दिवसात वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गजांची निवृत्ती : Lendl Simmons Retirement From International | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lendl simmons

एकाच दिवसात वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गजांची निवृत्ती

Lendl Simmons Retirement: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 22 जुलैपासून 3 वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर दोन्ही देशांदरम्यान 5 टी-20 सामन्यांची मालिकाही होणार आहे. पण त्याआधीच विंडीजच्या सलामीवीर लेंडल सिमन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

हेही वाचा: World Championships: 35व्या वर्षीही शेली फ्रेझर जगातील सर्वांत वेगवान महिला धावपटू

लेंडल सिमन्सने 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सिमन्सने वेस्ट इंडिजसाठी 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.58 च्या सरासरीने 1958 धावा केल्या. ज्यामध्ये दोन शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. सिमन्सची कसोटी कारकीर्द फारशी चांगली नव्हती तो 8 सामन्यांत 17.37 च्या सरासरीने केवळ 278 धावा करू शकला. सिमन्सने वेस्ट इंडिजसाठी 68 टी-20 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 26.78 च्या सरासरीने 1527 धावा केल्या. सिमन्सने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9 अर्धशतके झळकावली आहे.

हेही वाचा: तेजस्वी यादव यांचा क्रिकेटचा ‘डाव’

आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर, मुंबई इंडियन्सकडून खेळताना सिमन्सने 29 सामन्यात 39.96 च्या सरासरीने 1079 धावा केल्या आहेत. आयपीएल 2014 मध्ये त्याची कामगिरी अप्रतिम राहिली होती. त्यादरम्यान सिमन्सने 13 सामन्यांत 56.28 च्या सरासरीने 394 धावा केल्या होत्या. 2014 च्या आयपीएलमध्येही त्याने शतक केले होते.

Web Title: Lendl Simmons Announces Retirement From International Cricket West Indies Cricketer Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..