leo messi and cristiano ronaldo to face each other once again in champions league | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ronaldo and Messi
मेस्सी- रोनाल्डो पुन्हा एकदा आमने-सामने

मेस्सी- रोनाल्डो पुन्हा एकदा आमने-सामने

- जयेश सावंत

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या (champions league) बाद फेरीचा 'ड्रॉ' आज सोमवारी जाहीर करण्यात आला असून, यात ख्रिस्टियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड (Manchester United) आणि लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) पॅरिस सेंट जर्मनचा (Paris Saint German) संघ आमने सामने येणार आहेत.

इतर प्रीमियर लीग संघांबद्दल बोलायचे झाल्यास गतविजेत्या चेल्सीला (Chelsea) इतरांच्या तुलनेत सोपा प्रतिस्पर्धी लिली (Lille) मिळाला आहे. तर इंग्लिश चॅम्पियन्स मँचेस्टर सिटीने (Manchester City) व्हिला रियलविरुद्ध (VIllarial) आणि लिव्हरपूल (Liverpool) रेड बुल साल्झबर्गविरुद्ध (RB Salzburg) दोन हात करणार आहेत. इतर सामन्यांमध्ये इटालियन चॅम्पियन्स इंटरमिलानचा (Inter) सामना डच चॅम्पियन्स अजॅक्सविरुद्ध (Ajax) होईल. तर स्पोर्टिंगचा (CP Sporting) सामना युव्हेंटस (Juventus) तर बेनफिकाचा (Benfica) सामना रिअल माद्रिदशी (Real Madrid) होईल.त्याचबरोबर २०२० चे विजेते बायर्न मुनीचसमोर (Bayran Munich ) ऍथलेटिको माद्रिद (Athletico Madrid) संघाचे आव्हान असेल.

हेही वाचा: ''ट्विटरवर जरा चांगलं लिहीत जा'' हसन अली पत्रकारावर भडकला Video

हेही वाचा: मध्य प्रदेशच्या 'सुपर सेव्हर' फिल्डिंगचा Video पाहिलात का?

परंतु त्याआधी चॅम्पियन्स लीग (Champions League )अंतिम-16 च्या ड्रॉचा सोहळा सोमवारी गोंधळात पार पडला. कारण, मँचेस्टर युनायटेडचा संघाला त्यांच्याच गटातील प्रतिस्पर्धी व्हिलारियलविरुद्ध खेळावे लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले. चॅम्पियन्स लीग ड्रॉमध्ये एकाच देशातील संघ किंवा साखळी फेरीत एकाच गटात असलेले संघ कधीही प्रतिस्पर्धी म्हणून एकत्र येत नाहीत. यामुळे अॅटलेटिको माद्रिद किंवा बायर्नविरुद्ध खेळण्याची त्यांची संधी हुकली. मात्र यामुळे फुटबॉलप्रेमींना पुन्हा एकदा मेस्सी-रोनाल्डो हा सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Leo Messi And Cristiano Ronaldo To Face Each Other Once Again In Champions League

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..