शांत बसा! धोनी तुम्हाला विचारुन निवृत्त होणार नाहीये

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

- धोनीला त्याच्या मर्जीनुसार निवृत्त होऊ द्यावे : व्हॉटमोर

- महेंद्रसिंह धोनीला त्याच्या मर्जीनुसार निवृत्त होऊ द्यावे. त्याने तेवढी योग्यता कामगिरीद्वारे साध्य केली आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू आणि श्रीलंकेचे माजी प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर यांनी व्यक्त केले.

लंडन :  महेंद्रसिंह धोनीला त्याच्या मर्जीनुसार निवृत्त होऊ द्यावे. त्याने तेवढी योग्यता कामगिरीद्वारे साध्य केली आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू आणि श्रीलंकेचे माजी प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान लक्षात घेतले गेलेच पाहिजे. त्याला निवृत्त व्हावे लागले तरी त्याला तसे त्याच्या मनानुसार करू दिले गेले पाहिजे. त्याच्या निवृत्तीची मागणी काहीशी गैर आहे. तशी वेळ आली आहे, पण तो निर्णय त्याने घ्यायला हवा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let Dhoni retire according to his will says Whatmore