esakal | मेस्सीची गोलची हॅटट्रिक; मोडला महान फुटबॉलर पेले यांचा विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel-Messi

मेस्सीची गोलची हॅटट्रिक; मोडला महान फुटबॉलर पेले यांचा विक्रम

sakal_logo
By
विराज भागवत

लियोनेल मेस्सीने बोलिव्हियाविरूद्ध केली धमाकेदार कामगिरी

FIFA 2022 World Cup qualifier या स्पर्धेत लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने बोलिव्हियाचा ३-० असा पराभवा केला. अर्जेंटिनाकडून तिन्ही गोल त्यांचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू मेस्सीने केले. मेस्सीने तीन गोल करत आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वात ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम केले. मेस्सीने सामन्यातील दुसरा गोल आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७८वा गोल मारला तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय गोलच्या संख्येत पेले यांना मागे टाकले. या यादीत पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्टीयानो रोनाल्डो या अव्वल आहे.

लियोनेल मेस्सीने बोलिव्हियाच्या संघाविरोधात दमदार सुरूवात केली. १४व्या मिनिटाला मेस्सीने आपल्या कारकिर्दीतील ७७वा गोल मारला आणि पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर उत्तरार्धात ६४व्या मिनिटाला त्याने आणखी एक गोल करत पेले यांच्या विक्रमाला मागे टाकले. मेस्सी येथेच थांबला नाही. सामना संपण्यासाठी दोन मिनिटांचा कालावधी असताना त्याने आणखी एक गोल करत गोल्सची हॅटट्रिक केली. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही त्याची गोल्सची सातवी हॅटट्रिक ठरली.

loading image
go to top