Lionel Messi In India : लिओनेल मेस्सी चीन ऐवजी भारतात खेळला असता, अर्जेंटिनानेच दिला होता प्रस्ताव मात्र...

Lionel Messi could have played In India
Lionel Messi could have played In Indiaesakal
Updated on

Lionel Messi could have played In India : फुटबॉल जगतातील सर्वोकृष्ट फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला भारतात खेळताना पाहण्याची संधी चालून आली होती. मात्र ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने अर्जेंटिनाचा हा प्रस्ताव स्विकारला नाही. त्यामुळे भारतातील लाखो मेस्सी प्रेमींची मोठी निराशा झाली आहे.

Lionel Messi could have played In India
BCCI Gary Kirsten : बीसीसीआय गॅरी कर्स्टनकडे पुन्हा प्रशिक्षक पद देणार होती मात्र एका अटीमुळे...

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सचिव शाजी प्रभाकरन यांनी अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशनने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनशी याबाबत संपर्क केला होता. त्यांनी एका मैत्रीपूर्ण सामन्याचा प्रस्ताव देखील ठेवला होता. मात्र आम्हाला हा प्रस्ताव नाकारावा लागला. कारण भारताकडे हा सामना आयोजित करण्यासाठी लागणारी आर्थिक ताकद नव्हती. यामुळे लाखो मेस्सी प्रेमींचा हिरमोड झाला आहे. त्यांच्या हातून मेस्सीला भारतात खेळताना पाहतानाची संधी निसटली.

Lionel Messi could have played In India
Ravichandran Ashwin : माझे कुटुंबीय दुप्पट तणावात... WTC Final नंतर अश्विन मानसिक आघातावर बोलला

प्रभाकरन म्हणाले की, 'अर्जेंटिनाने आमच्याकडे मैत्रीपूर्ण सामना खेळण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र आम्हाला यासाठी लागणारी पैशाची ताकद उभा करणे शक्य नव्हते. अशा प्रकारचा सामना भारतात होण्यासाठी आम्हाला एका भक्कम पार्टनरची गरज होती. अर्जेंटिनाकडे मोठी आर्थिक ताकद आहे आमची आर्थिक स्थिती पाहता आम्हाला मर्यादा होत्या.'

ते पुढे म्हणाले की, 'गल्फ देशांची गोष्ट वेगळी. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना म्हणजे मोठी तफावत झाली असती.' असे असले तरी प्रभाकरन हे अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशन सोबत आपले संबंध घट्ट करण्याबाबत आशावादी आहेत. ते म्हणाले की, 'आम्हाला अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशनसोबत भागीदारी करण्याची इच्छा आहे. अर्जेंटिना देखील यामध्ये चांगला रस दाखवत आहे. त्यांचे क्लब देखील यासाठी उत्सुक आहेत.'

Lionel Messi could have played In India
Sourav Ganguly : दादाच्या जमिनीवर कब्जा; फोनवरून शिवीगाळ, महिला पीएशी देखील गैरवर्तन

मिळालेल्या माहितीनुसार अर्जेंटिनाने भारत आणि बांगलादेशमध्ये प्रत्येकी एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्याची योजना आखली होती. मात्र हे सामने होण्यासाठी लागणारा निधी या दोन्ही फुटबॉल संघटनांना जमवणे शक्य नव्हते. त्यामुळे अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलिया आणि चीनसोबत सराव सामना खेळला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com