Abhinav Bindra: काय साध्य करण्याचा प्रयत्न केला? लियोनेल मेस्सीच्या दौऱ्याबाबत बिंद्राचा टीकात्मक प्रश्न
Lionel Messi India visit: लियोनेल मेस्सीच्या भारत दौऱ्यावर अभिनव बिंद्राने परखड टीका करत क्रीडासंस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ सेलिब्रिटी पूजन नव्हे, तर पायाभूत क्रीडा व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
नवी दिल्ली : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याची सांगता सोमवारी नवी दिल्लीत झाली. कोलकाता वगळता हैदराबाद, मुंबई व नवी दिल्ली येथे लियोनेल मेस्सीच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला.