Lionel Messi : आजीने कोचकडे तगादा लावला अन् जगाला 'जादुगार मेस्सी' मिळाला

Lionel Messi Grandmother Family FC Barcelona
Lionel Messi Grandmother Family FC Barcelonaesakal

Lionel Messi Grandmother Family FC Barcelona : फिफा वर्ल्डकप 2022 चा अंतिम सामना हा अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात होणार आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्यामुळे अर्जेंटिना आपल्या लाडक्या लिओची वर्ल्डकप जिंकून सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी अंतिस सामन्यात जीवाचे रान करेल यात शंका नाही. मेस्सीचा हा अर्जेंटिनाकडूनचा शेवटचा सामना आहे.

याबाबतचे संकेत त्याने फायनलपूर्वीच दिले. सध्याच्या युगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जाणारा लिओ मेस्सी आता अर्जेंटिनाच्या जर्सीत पुन्हा कधी दिसणार नाही. या ड्रिबलिंगची दैवी देणगी लाभलेल्या मेस्सीचा आतापर्यंत प्रवास हा साधा सोपा नव्हता. आज आपण मेस्सीचे अर्जेंटिनामधील बालपण, त्यानंतर तो स्पेनमध्ये कसा पोहचला, त्याने दुर्मिळ आजारावर कशी मात केली याचा मागोवा घेणार आहोत.

Lionel Messi Grandmother Family FC Barcelona
Luka Modric : आजोबांना मारलं, घर जाळलं; याच निर्वासित 'लुका'नं क्रोएशियाला सेमी फायनलपर्यंत आणलं

फॅक्टरी वर्करचा मुलगा फुटबॉलमध्ये रमला

1 - अर्जेंटिनामधील सँटा फे प्रांतातील रोसारिया शहरात जॉर्ज मेस्सी आणि सेलिया मारिया कुकसिटीनी यांच्या पोटी लिओनेल मेस्सीने 24 जून 1987 ला जन्म घेतला. फुटबॉल वेडे कुटुंब असल्याने मेस्सीचे बालपण हे फुटबॉलच्या भोवतीच गेले. त्याला तीन भावंड आहेत. रॉड्रिगो आणि माटिआस हे दोन मोठे भाऊ आणि मारिया सोल ही बहीण. मेस्सीचे वडील जॉर्ज हे स्टील फॅक्टरीत कामगार होते. तर आई पार्ट टाईम काम करत होती.

2 - मेस्सीने पाचव्या वर्षापासूनच स्थानिक फुटबॉल क्लबकडून फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात त्याचे वडीलच त्याचे कोच होते. आठव्या वर्षी त्याने नेवेल्स ऑल्ड बॉईज हा प्रतिभावान फुटबॉल क्लबकडून खेळण्यास सुरूवात केली. या संघाने पुढच्या चार वर्षात फक्त एकच सामना गमावला होता. त्यामुळे या संघाला द मशिन 87 असे नाव देखील पडले होते.

3 - मात्र दुर्दैवाने मेस्सीला 11 व्या वर्षी ग्रोथ हार्मोन कमतरतेच्या आजाराचे निदान झाले. स्थानिक स्तरावर आपल्या फुटबॉलच्या कौशल्याने सर्वांना भुरळ घालणाऱ्या मेस्सीला स्थानिक क्लबकडून कोणतीच मदत मिळाली नाही. ते मेस्सीला त्यांच्या क्लबकडून खेळण्यासाठी पैसे देत नव्हते.

4 - अखेर एफसी बार्सिलोनाचे स्पोर्टिंग डायरेक्टर कार्लेस रेक्साच हे मेस्सीच्या मदतीला धावले. त्याने मेस्सीच्या उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांनी एक अट घातली की मेस्सीला स्पेनमध्ये रहावं लागले. त्यानंतर मेस्सीने बार्सिलोनाच्या युथ अॅकेडमीत प्रवेश घेतला.

Lionel Messi Grandmother Family FC Barcelona
Messi Fan Jushna Shahin : मेस्सीची 'जबरा फॅन' केरळच्या जुशना शाहीनच्या हट्टापायी नवऱ्याला सोडावा लागला देश

आजीने त्या दिवशी कोचला पिडलं म्हणून...

5 - या सर्व घडामोडी घडत असताना मेस्सीचा आजी सेलिया ऑलिव्हेरा कुकसिटीनी यांचे 1998 मध्ये निधन झाले. आई वडील दोघेही कामावर जात असताना मेस्सीच्या आजीनेच लिओचा सांभाळ केला होता. तसेच मेस्सीच्या आजीमुळेच मेस्सी आपला पहिला फुटबॉलचा सामना खेळला होता.

याबाबत बोलताना मेस्सी म्हणाला होता की तो 4 वर्षाचा असताना मी क्लबकडून खेळण्यास सुरूवात केली होती. माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठे असलेल्या मुलांचा सामना सुरू होता. त्यांना एका खेळाडूची गरज होती. माझ्या आजीने कोचला मला सामन्यात खेळवण्याची विनंती केली. कोचने मी लहान असल्याचे कारण दिले होते. मात्र माझी आजी मागे लागली आणि मी सामना खेळलो.

6 - आजीमुळे फुटबॉलचा सामना खेळायला मिळालेल्या मेस्सीच्या प्रत्येक गोल सेलिब्रेशनमध्ये आजीचे कनेक्शन असते. तो आपल्या दोन्ही हातीची बोटे स्वर्गाकडे दाखवत आपला गोल आजीला समर्पित करतो.

Lionel Messi Grandmother Family FC Barcelona
Sachin Tendulkar : 'ती' जाहिरात केली असती तर घरी जाऊ शकलो नसतो; सचिनने सांगितला शारजातील इनिंगनंतरचा किस्सा

ग्लॅमरस मॉडेलशी अफेअर मात्र हात धरला अँटोनेलाचा

7 - मेस्सीची लव्ह लाईफ देखील खूप रंजक आहे. 2006 च्या वर्ल्डकपपूर्वी मेस्सी त्याचे होमटाऊन रोसारियो येथे दुखापतीतून सावरत होता. त्यावेळीच तेथील लोकल मुलगी मॅकरेना लेमोस हिच्यासोबत त्याचे लिंकअप झाले होते. त्यानंतर मेस्सीने अर्जेंटिनाची ग्लॅमरस मॉडेल लुसियाना सालाझार हिच्यासोबतही प्रेमसंबंध जुळले होते. मात्र अखेर मेस्सीचे पत्नी अँटोनेला रोकुझो सोबत आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या.

8 - त्यानंतर अँटोनेलाने मेस्सीच्या पहिल्या मुलगा थियागोला 2 नोव्हेंबर 2012 मध्ये जन्म दिला. त्यानंतर 11 सप्टेंबर 2015 ला माटेओला या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

9 - अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अँटोनेला आणि लिओनेल मेस्सी यांनी 30 जून 2017 मध्ये लग्नगाठ बांधली.

10 - यानंतर मेस्सी आणि अँटोनेला यांनी आपल्या तिसऱ्या मुलाला सिरो मेस्ली रोकुझोला 2018 मध्ये जन्म दिला.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com