Sachin Tendulkar : 'ती' जाहिरात केली असती तर घरी जाऊ शकलो नसतो; सचिनने सांगितला शारजातील इनिंगनंतरचा किस्सा

Sachin Tendulkar On Ad Rejection
Sachin Tendulkar On Ad Rejection esakal

Sachin Tendulkar On Ad Rejection :

सचिन तेंडुलकरच्या ऑनलाइन गेमच्या जाहीरातीवरुन पुन्हा एकदा माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सचिन तेंडुलकरच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर बच्चू कडूंसह त्यांचे कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले आहेत. सचिन तेंडुलकरने ऑनलाइन गेमची जाहीरात करु नये, असं बच्चू कडू यांनी म्हंटलं आहे. आंदोलनासाठी आलेल्या बच्चू कडू यांना पोलिसांनी रोखलं आहे.

आज जरी जाहिरातीमुळे वादात अडकला असला तरी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत सचिन जाहिरात करताना आपली मर्यादा पाळत आला आहे. त्याने गेल्या वर्षी इन्फोसिसच्या एका कार्यक्रमात गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीत शारजाती 1998 मध्ये खेळलेल्या दमदार इनिंगनंतरचा एक किस्सा सांगितला.

Sachin Tendulkar On Ad Rejection
AUS vs SA 1st Test : ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी मैदानात आले पोलीस; स्मिथ - वॉर्नर झाले भावूक

सचिन तेंडुलकरने शारजामध्ये 1998 ला ऑस्ट्रेलियाविरूद्ध 131 चेंडूत 143 धावांची धुवांधार इनिंग खेळली होती. यानंतर मायदेशात परतल्यावर त्याला एका स्पॉन्सरने जाहिरात करण्यासाठी संपर्क केला. यावेळीचा हा किस्सा सचिनने सांगितला.

सचिन म्हणाला की, 'हा किस्सा 1998 च्या शारजामधील डेझर्ट स्टॉर्म दौऱ्यानंतर घडला. आम्ही दौऱ्यावरून मायदेशात परतलो. एक स्पॉन्सर मला घेऊन एक जाहिरात करणार होता. त्याने यासाठी माझ्याशी संपर्क साधला. मी डास, किडे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटने चेंडू मैदानाबाहेर मारतो अशा पद्धतीची ती जाहिरात होती. मी ती जाहिरात नाकारली. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला या जाहिरातीची स्क्रीप्ट बदलावी लागले. मी माझ्या खेळाचा असा अनादर करू शकत नाही. मी माझ्या खेळाची पूजा करतो. मी ही जाहिरात करणार नाही.'

Sachin Tendulkar On Ad Rejection
Messi Fan Jushna Shahin : मेस्सीची 'जबरा फॅन' केरळच्या जुशना शाहीनच्या हट्टापायी नवऱ्याला सोडावा लागला देश

सचिनच्या या पवित्र्यानंतर स्पॉन्सरने जाहिरातीची स्क्रीप्ट बदलली. सचिन पुढे म्हणाला की, 'त्यांनी ती स्क्रीप्ट बदलली. जर मी ती जाहिरात तशीच शूट केली असती तर मी घरी तोंड दाखवू शकलो नसतो. मी माझ्या प्रशिक्षकांपुढे परत उभा राहू शकलो नसतो. हे असलं त्यांनी कधी मला शिकवलं नव्हतं. त्यांनी माला योग्य मुल्य शिकवली होती. मी ती मुल्ये सत्यात उतरवण्याचा कायम प्रयत्न करत असतो.'

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com