When the God of Cricket met the God of Football, Sachin Tendulkar and Lionel Messi share an unforgettable moment at Wankhede
esakal
क्रीडा
क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral
Lionel Messi meets Sachin Tendulkar : फुटबॉलचा देव क्रिकेटच्या देवाला भेटला, वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरकडून लिओनेल मेस्सीला खास १० नंबरची जर्सी भेट, ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार मुंबई
फुटबॉलच्या जगतातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी मुंबईत दाखल झाले असून, वानखेड़े स्टेडियममध्ये त्यांच्या उपस्थितीने वातावरण उत्साहाने भरले आहे. क्रिकेटच्या देवता सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलच्या देवता मेस्सी यांची भेट हा क्रिडारसिकांसाठी अविस्मरणीय क्षण ठरला. या भेटीमध्ये सचिनने मेस्सीला १० क्रमांकाची विशेष जर्सी भेट दिली, जी प्रत्येक चाहत्याच्या मनात कायमची कोरली जाईल.

