

Lionel Messi Mumbai Tour
sakal
मुंबई : लोकप्रिय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या उपस्थितीत कोलकाता येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती मुंबईत घडू नये, या उद्देशाने मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तासह आवश्यक त्या उपाययोजना केल्याचा दावा शनिवारी (ता. १३) केला. लियोनेल मेस्सी रविवारी (ता. १४) मुंबईत असणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई सज्ज झाली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मेस्सी, सचिन तेंडुलकर व सुनील छेत्री हे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज सोबत दिसणार आहेत.