'डोपिंग'मध्ये अडकले  हे देखील क्रिकेटपटू 

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

क्रिकेट आणि उत्तेजक चाचणी याचा तसा फारसा जवळचा संबंध नाही. पण, त्यानंतरही उत्तेजक सेवन प्रकरणात अडकणारा पृथ्वी शॉ हा पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वी शेन वॉर्न, स्टिफन फ्लेमिंग या स्टार खेळाडूंवर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अन्य भारतीय खेळाडू देखील यात अडकले आहेत. 

कोण आहेत हे खेळाडू : 

युसूफ पठाण : 2017 मध्ये टब्रुटलाईन हे पृथ्वी शॉच्या चाचणीत सापडलेलेच उत्तेजक सेवन केल्या प्रकरणी दोषी. पाच महिन्याची बंदी (15 ऑगस्ट 2017 ते 14 जानेवारी 2018) 
प्रदीप सांगवान : 2013 मध्ये आयपीएल स्पर्धेत दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे प्रतिनिधीत्व करताना दोषी. 18 महिन्यांची बंदी 
अभिषेक गुप्ता : पंजाबचा यष्टिरक्षक फलंदाज अशाच प्रकारे सर्दीच्या औषधातून अजाणतेपणी उत्तेजक सेवन केल्या प्रकरणी दोषी. 8 महिन्यांची बंदी (15 जानेवारी 2018 ते 14 सप्टेंबर 2018) 
शेन वॉर्न : 2003 विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी घेतलेल्या चाचणीत दोषी. स्पर्धा सुरु होण्याच्या एक दिवस आधीच मायदेशी परत पाठवण्यात आले. एक वर्षाची बंदी 
शोएब अख्तर : कारकिर्दीत उत्तेजक सेवनाच्या आरोपानेच अधिक गाजला. 2006 मध्ये दोषी आढळल्यावर दोन वर्षांची बंदी. 
स्टिफन फ्लेमिंग : न्यूझीलंडचा हा कर्णधार 1993-94 मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी. बंदीचा निश्‍चित कालावधी उपलब्ध नाही. पण, काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: List of cricketers who were also found guilty for doping