हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Liverpool Star Diogo Jota Dies in Car Crash at 28 :लिव्हरपूल व पोर्तुगाल संघाचा स्टार फुटबॉलर डिओगो जोटा याचे वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी दुर्दैवी अपघातात निधन झाले आहे. हा अपघात स्पेनमध्ये झाला असून, तो इतका भीषण होता की जोटाचा जागीच मृत्यू झाला.
DIOGO JOTA DIES IN CAR ACCIDENT
DIOGO JOTA DIES IN CAR ACCIDENT esakal
Updated on

Portuguese footballer Diogo Jota killed in road accident : फुटबॉलविश्वाला चटका देणारी दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. लिव्हरपूल क्लबकडून खेळणारा पोर्तुगालला फुटबॉलपटू डियोगो जोटा याचे कार अपघातात निधन झाले. दहा दिवसांपूर्वी त्याचं Rute Cardoso सोबत लग्न झालं होतं. अनेक परदेशी माध्यमांनी जोटाच्या निधानाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या कार अपघातात त्याच्या भावाचाही मृत्यू झाला आहे. पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने सोशल मीडियावर या वृत्ताची पुष्टी केली आणि श्रद्धांजली वाहिली.

पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने निवेदनात म्हटले की, "पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशन आणि संपूर्ण पोर्तुगाल फुटबॉल समुदाय यांना आज सकाळी स्पेनमध्ये डियोगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा यांच्या निधनाने पूर्णपणे धक्का बसला आहे. राष्ट्रीय अ संघासाठी जवळजवळ ५० सामने खेळलेले डिओगो जोटा एक असाधारण व्यक्ती होते. त्याचा सर्व सहकाऱ्यांनी आणि अगदी विरोधी संघाच्या खेळाडूंनीही आदर केला."

डियोगो जोटा जन्म ४ डिसेंबर १९९६ मध्ये पोर्तुगालच्या पोर्तो येथे झाला होता आणि २०१४ मध्ये त्याने पोर्तुगालच्या १९ वर्षांखालील संघात स्थान पटकावले होते. पाच वर्षानंतर त्याने राष्ट्रीय संघात एन्ट्री घेतली. ४९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने १४ गोल्स केले आहेत. जोटा २०२० मध्ये लिव्हरपूल क्लबमध्ये सामील झाला आणि क्लबसोबतच्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने १२३ सामन्यांत ४७ गोल्स केले. तो फॉरवर्ड, लेफ्ट विंगर पोझिशनमध्ये खेळायचा.

जोटा आणि रुटे कार्डोसो यांनी अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २२ जून २०२५ रोजी लग्न केले होते, काही दिवसांपूर्वी त्यांनी एक फोटो शेअर करून याबद्दल माहिती दिली होती. बुधवारी त्यांच्या पत्नीनेही लग्नाचा व्हिडिओ शेअर केला. डिओगो आणि रुटे यांना ३ मुले देखील आहेत.

आज जोटा उत्तर पोर्तुगालमधून बाहेर पडण्यासाठी ए-५२ मार्गावरून प्रवास करत होता. या दरम्यान त्याच्या कारला अपघात झाला, ज्यामध्ये त्याचे आणि त्याच्या भावाचाही मृत्यू झाला. ख्रिस्तियानो रोनाल्डोने ट्विट केलं की, "काल परवा आपण राष्ट्रीय संघात एकत्र होतो आणि आताच तुझं लग्न झालं होतं. विश्वासच बसत नाही. तुझ्या कुटुंबाला, तुझ्या पत्नीला, आणि तुझ्या लहानग्यांना माझ्या संवेदना. त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी संपूर्ण जगातील बळ मिळो, हीच प्रार्थना. मला माहिती आहे, तू कायम त्यांच्यासोबत असशील… डियोगो आणि आंद्रे, तुम्हा दोघांनाही अंतिम प्रणाम. आम्ही सगळे तुम्हाला कायम मिस करू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com