

Athlete Jyoti Gavate Calls for Fairer Asian Games Selection Process
Sakal
मुंबई : परभणीची धावपटू ज्योती गवते चार वर्षांच्या कालावधीनंतर मुंबई मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. मराठमोळ्या कन्येशी याप्रसंगी संवाद साधण्यात आला. मुंबई मॅरेथॉनच्या अनुषंगाने भारतीय खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळवता येणार आहे; मात्र भारतीय ॲथलेटिक्स संघटनेकडून ठेवण्यात आलेला पात्रतेचा निकष आव्हानात्मक ठेवण्यात आला आहे. भारतीय महिला खेळाडूंसाठी पूर्ण मॅरेथॉनसाठीचा निकष दोन तास ३१ मिनिटे व ५२ सेकंद असा ठेवण्यात आला आहे.