न्यूझीलंडचा भारत दौरा; BCCI ने आखलाय मास्टर प्लॅन

28 वर्षानंतर या मैदानात कसोटी सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.
IND vs NZ
IND vs NZ

सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तान विरुद्धची मालिका रद्द करणारा न्यूझीलंडचा संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एक कसोटी सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 28 वर्षानंतर या मैदानात कसोटी सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.

आगामी आयपीएलमध्ये दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. यात लखनऊ शर्यतीत असल्याचे संकेतही बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिले. आयपीएलच्या नव्या फ्रेंचायझींचा समावेश होण्यापूर्वी लखनऊला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळावी, या हेतून न्यूझीलंड विरुद्धचा एक कसोटी सामना लखनऊच्या मैदानात खेळवण्यात येईल, असे ते म्हणाले.

IND vs NZ
IPL 2021 : गंभीरनं काढली CSK सह धोनीतील खोट

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यावरील कसोटी सामन्यासंदर्भात भाष्य केले. स्टेडियममध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. या स्टेडियममध्ये 70 हजार प्रेक्षक क्षमताही आहे. कोणत्याही आयपीएल फ्रेंचायझीसाठी ही एक मोठी गोष्टच आहे. आयपीएलमधील नव्या दोन टीम फायनल होण्यापूर्वी अहमदाबादसह लखनऊच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमकडे दृष्टिक्षेपात आणणं महत्त्वाचे आहे. जर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा ठरल्याप्रमाणे भारतात झाली असती तर लखनऊमध्येही काही सामने ठेवण्यात आले असते, असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

आयपीएलच्या आगामी हंगामात दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे. यातील एक टीम लखनऊची असेल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही याचे संकेत दिले आहेत.

IND vs NZ
कोहली पाठोपाठ शास्त्री गुरुजींनी दिले कोच पदावरुन हटण्याचे संकेत

लखनऊमध्ये आतापर्यंत एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला होता. 1994 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना केडी सिंह बाबू स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या स्टेडियमवर सध्या आंतरराष्ट्रीय सामने होत नाहीत. अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर उत्तम दर्जाच्या सुविधा आणि प्रेक्षक क्षमताही भव्य आहे. न्यूझीलंडचा संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसह 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 मालिकेनं न्यूझीलंडचा संघाच्या भारत दौऱ्याची सुरुवात होणा आहे. 2016 नंतर न्यूझीलंडने भारतात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे आगामी दौऱ्यात त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com