Magnus Carlsen: गुकेशचा विजय, मॅग्नस कार्लसन हतबल! ‘माझ्या खेळात लय हरवली,बुद्धिबळातील आनंद गमावलाय
Chess Struggles : विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला सलग दुसऱ्या स्पर्धेत डी. गुकेशकडून पराभव स्वीकारावा लागला. यावर कार्लसनने, “मी सध्या बुद्धिबळाचा आनंद घेऊ शकत नाही,” असे म्हटले.
झाब्रेग : विश्वविजेता डी. गुकेशकडून सलग दुसऱ्या स्पर्धेत झालेला पराभव विख्यात आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला सहन झाला नाही. सलग दुसऱ्या पराभवानंतर, ‘मी सध्या बुद्धिबळाचा आनंद घेऊ शकत नाही,’ असे विधान त्याने केले.