Gukesh Dommaraju
Gukesh Dommarajusakal

Gukesh Dommaraju : गुकेशने विजेतेपदाची संधी गमावली; नॉर्वे बुद्धिबळ, गतविजेत्या कार्लसनची सातव्यांदा जेतेपदावर मोहर

Norwegian Open Chess Tournament : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनने विजेतेपद पटकावले. डी. गुकेश यांनी फॅबियानो कारुआनाविरुद्धच्या लढतीत चुका केल्याने विजेतेपदाची संधी गमावली.
Published on

स्टॅवँजर (नॉर्वे) : भारताचा विश्‍वविजेता खेळाडू डी. गुकेश याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात विजेता होण्याची संधी गमावली. अखेरच्या फेरीआधी डी. गुकेश व मॅग्नस कार्लसन यांच्याकडे जेतेपदाची संधी होती; पण दहाव्या फेरीत फॅबियानो कारुआनाविरुद्ध खेळताना दबावाखाली गुकेशकडून चुका घडल्या. कार्लसनने मात्र अर्जुन एरीगेसी याला बरोबरीत रोखले व सातव्यांदा ही मानाची स्पर्धा जिंकण्याचा मान संपादन केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com